LSG vs GT : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजचा 57 वा सामना सुरु आहे. या सामन्यात लखनौ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स (LSG vs GT) हे दोन्ही संघ आमने-सामने आहेत. सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा काहीसा वेगळा निर्णय घेतला. जो निर्णय त्यांना भोवला असून लखनौने भेभेदक गोलंदाजी करत त्यांना 144 धावांत रोखले आहे. यावेळी शुभमन गिलने केवळ एकहाती झुंज देत नाबाद 63 धावा केल्यामुळे संघ लखनौसमोर 145 धावांचे लक्ष्य ठेवू शकला आहे.
सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकत गुजरातने फलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना सायंकाळी असून देखील गुजरातने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना दवाची अडचण येण्याची शक्यता असतानाही गुजरातने हा निर्णय घेतला आहे. त्यांत त्यांची फलंदाजीही खास कामगिरी करु शकलेली नाही. सलामीवीर साहा 5 धावांवर बाद झाला. त्यानंतर मॅथ्यू देखील 10 धावा करुन तंबूत परतला आहे. कर्णधार पांड्याही 11 धावा करुन बाद झाला. मिलर 26 धावा करु शकला आहे. दुसरीकडे शुभमन एकहाती झुंज देत होता. त्याने नाबाद 63 धावा केल्या असून राहुल तेवतियाने नाबाद 22 धावांची साथ त्याला दिली आहे.
आवेशसह मोहसीनची भेदक गोलंदाजी
लखनौच्या साऱ्याच गोलंदाजांनी कमाल गोलंदाजी केली. यावेळी आवेशने सर्वाधिक 2 तर जेसन आणि मोहसीनने एक-एक विकेट घेतली. पण यावेळी मोहसीनने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत 4 षटकात केवळ 18 धावा दिल्या. तर आवेशने देखील 4 षटकात केवळ 26 धावा दिल्या आहेत.
हे देखील वाचा-