Brendon Mccullum: न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमनं इंग्लंड कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. इंग्लंडचं माजी प्रशिक्षक सिल्व्हरवुड यांच्यानंतर तो प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारणार आहे, जे ऍशेसमध्ये संघाच्या अपयशानंतर पायउतार झाले होते. इंग्लंडनं गेल्या काही वर्षांत पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे आणि नवे प्रशिक्षक मॅक्युलम इंग्लंडच्या पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटपासून प्रेरणा घेण्यास उत्सुक आहेत.
ब्रेंडन मॅक्युलम काय म्हणाला?
प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ब्रेंडन मॅक्युलमनं प्रथमच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी तो म्हणाला की, “पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडनं काय मिळवले आणि इऑन मॉर्गननं जे काही केले ते मी पाहिले आहे,मी बेन स्टोक्ससोबतही तेच करायला उत्सुक आहे. कसोटी संघ तेच का करू शकत नाही? बेन स्टोक्सलाही संघात असेच स्वातंत्र्य हवं आहे. माझे आणि त्याचे विचार एकसाखरेच आहे."
कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडला नंबर वन बनवण्याचं लक्ष्य
इंग्लंडला नंबर वन बनवण्याचं माझं लक्ष्य आहे. यासाठी थोडा वेळ लागेल. परंतु, पुढच्या ऍशेसपर्यंत इंग्लंडच्या संघाला मजबूत स्थितीत घेऊन जायचंय. जिथे एकतर आम्ही त्यांना सहज पराभूत करू किंवा आम्हाला हरवण्यासाठी त्यांना कठीण जावं. मॅक्युलमला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रशिक्षणाचा अनुभव नाही. यासाठी त्यांनं अँडी फ्लॉवर आणि ट्रेव्हर बेलिस यांच्याशी चर्चा केली आहे, जे वेगवेगळ्या ठिकाणचे असूनही इंग्लंडची कोचिंग इको-सिस्टम समजतात.
जूनमध्ये न्यूझीलंडचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार असून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत ब्रेंडन मॅक्युलमच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडचा संघ न्यूझीलंडविरुद्ध कशी कामगिरी बजावतो? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हे देखील वाचा-
- IPL Final, GT vs RR: राजस्थानच्या संघासाठी धोक्याची घंटा, राशिद खान करतोय 'स्नेक शॉट'चा सराव
- Narendra Modi Stadium: जगातील सर्वात मोठं स्टेडियम! सर्वाधिक स्कोर, नामकरण आणि इतर महत्वाची माहिती
- IPL Final: आयपीएलच्या समारोप सोहळ्यात चमकणार बॉलिवूड तारे; कार्यक्रमाची वेळ, प्रमुख पाहुण्यांची यादी आणि इतर माहिती