Amit Shah Sonal Shah IPL 2022 Final Gujarat Titans vs Rajasthan Royals : राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आयपीएल चषकासाठी लढत सुरु आहे. या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थान संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 130 धावा केल्या आहे. जोस बटलरने राजस्थानकडून सर्वाधिक 39 धावांची खेळी केली आहे.  गुजरात आणि राजस्थान यांच्यातील फायनल सामना पाहण्यासाठी अनेक स्पेशल गेस्ट आलेत. यामध्ये केंद्रीय  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचाही समावेश आहे. सामन्यादरम्यानचा अमित शाह यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय.  


अहमदाबाद येथे सुरु असलेला आयपीएल फायनलचा सामना पाहण्यासाठी अमित शाह पत्नी सोनल शाह यांच्यासोबत स्टेडिअममध्ये पोहचले आहेत. सामन्यादरम्यान कॅमेरामनने केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे कॅमेरा फिरवला होता. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा सामना पाहण्यासाठी खिलाडी अक्षय कुमारही आला होता. अमित शाह यांची पत्नी सोन शाह यांनी अक्षय कुमारसोबत फोटोही घेतला. 


 














राजस्थानची फलंदाजी फेल - 
नाणेफेक जिंकत राजस्थानच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. एक मोठी धावसंख्या करुन गुजरातवर दबाव टाकण्याचा निर्धार राजस्थानने केला असावा, पण गुजरातच्या भेदक गोलंदाजीमुळे राजस्थानचा हा निर्णय़ पुरता फसला. संघाची ठिक-ठाक झालेली सुरुवात नंतर मात्र संपूर्णपणे ढासळली. सलामीवीर यशस्वी आणि बटलर क्रिजवर असताना एक मोठी धावसंख्या होईल असं वाटतं होतं. यशस्वी फटकेबाजी देखील करत होता. पण 22 धावा करुन तो बाद झाल्यानंतर मात्र राजस्थानचा डाव धीमा झाला. यशने ही विकेट घेतली होती. त्यानंतर कर्णधार संजू बटलर सोबत डाव सांभाळत असतानाच गुजरातचा कर्णधार हार्दिकने संजूला बाद केलं. ज्यानंतर काही वेळातच पडिक्कलही बाद झाला. पण बटलर क्रिजवर असल्यामुळे सर्वांना आशा होती, पण पांड्याने आणखी एक दमदार चेंडूवर बटलरलाही तंबूत धाडलं. ज्यानंतर मात्र एकाही फलंदाजाला टिकून खेळता आलं नाही. बटलरच्या 39 धावा सर्वाधिक राहिल्या. हिटमायर आणि बोल्ट यांनी प्रत्येकी 11 तर रियानने 15 धावांची खेळी केली. संपूर्ण संघ मिळून केवळ 130 धावाच करु शकला आहे.




 



गोलंदाजीत हार्दिक ठरला कमाल - 
गुजरात संघाच्या सर्वच खेळाडूंनी कमाल गोलंदाजी केली. पण कर्णधार हार्दिक पांड्याने मात्र सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत महत्त्वपूर्ण तीन विकेट्स घेतल्या. पांड्याने 4 षटकात 17 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. यात संजू, बटलर आणि हेटमायर या महत्त्वाच्या विकेट्स होत्या. साईकिशोरने दोन तर यश दयाल, राशिद खान आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.