SRH vs PBKS, IPL 2022 : सनराइजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स हे दोन्ही संघ प्लेफमधून बाहेर पडले आहेत. रविवारी होणाऱ्या अखेरच्या सामन्यात विजय मिळवून शेवट गोड करण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरतील. दोन्ही संघाचा यंदाचा आयपीएल हंगाम खराब झालाय. दोन्ही संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आलेले नाही. फलंदाजीतील अपयश दोन्ही संघासाठी डोकेदुखी ठरलेय. अखेरच्या सामन्यात विजय मिळवत शेवट गोड करण्याचा प्रयत्न दोन्ही संघाचा असेल.  


हैदराबाद संघाची धुरा केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमार सांभाळण्याची शक्यता आहे. सनराइसर्ज हैदराबादने लागोपाठ पाच पराभवाची मालिका मुंबईविरोधात निसटता विजय मिळवत मोडली होती. पंजाबला आपल्या अखेरच्या सामन्यात दिल्लीकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.  मयांकच्या नेतृत्वात पंजाबची कामगिरी खराब राहिली आहे. यंदाच्या हंगामात पंजाबला लागोपाठ दोन सामने जिंकता आलेले नाहीत. कगिसो रबाडाचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला विकेट घेता आल्या नाहीत. अशात आजचा सामना जिंकून शेवट गोड करण्याच्या इराद्याने पंजाब उतरेल........ 


कधी आहे सामना?
आज 22 मे रोजी सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यात होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.
  
कुठे आहे सामना?
हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे.


कुठे पाहता येणार सामना?
सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स हा आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.


आणखी वाचा :


मुंबईच्या विजयानंतर प्लेऑफचं गणित ठरलं, आरसीबी टॉप 4 मध्ये, पाहा वेळापत्रक
IPL 2022 : मुंबईचा दिल्लीला दे धक्का, निर्णायक सामन्यात दिल्लीचा पाच विकेटने पराभव
मुंबईचा विजय होताच विराट कोहलीनं केले ट्वीट, आरसीबीच्या खेळाडूंचं जंगी सेलिब्रेशन
रोहित शर्माची IPLमधील सर्वात खराब कामगिरी यंदा, अर्धशतकही झळकावता आले नाही