CSK vs RCB : आज आयपीएलमधील (IPL 2022) दोन दमदार संघात सामना पाहायला मिळणार आहे. हे संघ म्हणजे चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (CSK vs RCB). मुंबई इंडियन्सनंतर सर्वात यशस्वी आयपीएल संघ म्हणजे चेन्नई सुपरकिंग्स. पण यंदाच्या हंगामात मात्र त्यांना एकही विजय मिळवता आलेला नाही. सलग चार पराभवानंतर आजतरी ते विजयाचं खातं खोलणार का? याकडे चेन्नई फॅन्सचं सर्वांचं लक्ष आहे. दुसरीकडे आरसीबीने दमदार कामगिरी करत चार पैकी तीन सामने जिंकले आहेत. 


आयपीएलमध्ये (IPL 2022) आज होणाऱ्या या चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु या सामन्यात नक्की कोणाच्या दिशेने सामना झुकणार हे आतातरी सांगता येणार नसला तरी सामना कधी आणि कुठे पाहू शकता, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


कधी आहे सामना?


आज 12 एप्रिल रोजी होणारा हा चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.  


कुठे आहे सामना?


हा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.


कुठे पाहता येणार सामना?


चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha