CSK vs KKR : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनच्या पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने दमदार चेन्नई सुपरकिंग्स (CSK vs KKR) संघाला सहा विकेट्सने मात देत स्पर्धेचा शुभारंभ केला आहे. केकेआरने आधी भेदक गोलंदाजी करत अवघ्या 131 धावांत चेन्नईला रोखलं. त्यानंतर रहाणेच्या 44 धावांच्या जोरावर अगदी सहज हे आव्हान पार करत सामना जिंकला. सामन्यात आधी चेन्नईचा निम्मा संघ 61 धावांवर तंबूत परतल्यानंतर धोनीने कर्णधार जाडेजासोबत मिळून संघाचा डाव सावरला. चेन्नईने131 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. पण नंतर केकेआरकडून रहाणेच्या 44 धावा आणि इतर खेळाडूंच्या धावांच्या जोरावर सहज लक्ष्य पार केले.



असा पार पडला सामना


सामन्यात केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे चेन्नईचे शिलेदार सर्वात आधी फलंदाजीला मैदानात उतरले. पण केकेआरच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून भेदक गोलंदाजी करत सामन्यात दबदबा राखला. अनुभवी उमेश यादवने पहिले दोन महत्त्वाचे विकेट घेत सामन्यात संघाला आघाडी मिळवून दिली. ऋतुराज शून्यावर, कॉन्वे 3 धावा करुन बाद झाल्यानंतर उथप्पा आणि रायडूने डाव काहीसा सावरला. पण उथप्पा 28 आणि रायडू 15 धावा करुन बाद झाले. दुबेही 3 धावा करुन तंबूत परतला. ज्यानंतर जाडेजा आणि धोनी यांनी संघाचा डाव सावरला. धोनीने 38 चेंडूत नाबाद 50 तर जाडेजाने 28 चेंडूत नाबाद 26 धावा झळकावत स्कोरबोर्डवर 131 धावा लावल्य़ा. ज्यामुळे केकेआरला विजयासाठी 132 धावांची गरज होती. 


दरम्यान 132 या माफक धावांचे लक्ष्य पार करण्याकरता केकेआरचा संघ मैदानात आला. ज्यावेळी अनुभवी अजिंक्यने दमदार अशा 34 चेंडूत 44 धावा केल्या. ज्यानंतर राणा, श्रेयस यांनी अनुक्रमे 21 आणि नाबाद 20 तर सॅमने 25 धावा केल्यामुळे हे आव्हान 4 विकेट्सच्या बदल्यात 18.3 ओव्हरमध्य़े पार केले. चेन्नईकडून ब्राव्होने तीन तर सँटनरने एक विकेट घेतली.


हे देखील वाचा- 


IPL 2022, MI vs DC : मुंबईकर उतरणार मैदानात, आयपीएलचा पहिला सामना दिल्लीविरुद्ध, कधी, कुठे पाहाल सामना?


IPL 2022 : आयपीएलचे 70 सामने मुंबई-पुण्यात, MI-CSK वेगवेगळ्या ग्रुपमध्ये, पाहा कोणता संघ कोणत्या ग्रुपमध्ये?


IPL 2022 : नवी मुंबईत आयपीएल सामन्यांसाठी कडक बंदोबस्त, 1200 हून अधिक पोलीस तैनात


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha