IPL 2022, MS Dhoni : आयपीएलच्या 15 व्या हंगामाला दण्यात सुरुवात झाली आहे. यंदा धोनी खेळाडू म्हणून आयपीएलमध्ये खेळणार आहे. असं पहिल्यांदाच झालेलं आहे की धोनी सीएसकेसाठी फक्त खेळाडू म्हणून खेळत आहे. आयपीएलला सुरुवात होण्याआधी काही दिवस धोनीनं कर्णधारपदाचा राजीनामा देत सर्वांनाच धक्का दिला होता. धोनीनं कर्णधारपद सोडल्यानंतर संघाची धुरा अष्टपैलू रवींद्र जाडेजाकडे सोपण्यात आली. यंदा चेन्नईचा संघ रवींद्र जाडेजाच्या नेतृत्वात खेळत आहे. जाडेजाला कर्णधारपद मिळाल्यानंतर त्याच्या पत्नीने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. यामध्ये धोनीचं कौतुक करण्यात आले.


रवींद्र जाडेजाकडे कर्णधारपद सोपण्यात आल्यानंतर पत्नी रिवाबा जाडेजा हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे. आपल्या पोस्टमध्ये रिवाबा हिने, रवींद्र जाडेजावर विश्वास दाखवल्यानंतर धोनी आणि चेन्नईच्या संघाचे आभार व्यक्त केले आहेत.    


काय म्हटलेय रिवाबाने आपल्या पोस्टमध्ये?
“रविंद्र जाडेजावर विश्वास दाखवल्याबद्दल आणि संधी दिल्याबद्दल धन्यवाद माही भाई,  तुम्ही त्यांच्यासाठी नेहमीच लीडर राहाल. तसेच तुम्ही नेहमीच संघासाठी थाला (थाला म्हणजे मोठा भाऊ) राहाल. चेन्नई संघाचेही खूप आभार” रिवाबाने आपल्या पोस्टसोबत धोनी आणि जाडेजाचा एक फोटो पोस्ट केला आहे.


रविंद्र जाडेजा चेन्नईचा तिसरा कर्णधार -
33 वर्षाचा रवींद्र जाडेजा 2012 मध्ये चेन्नईच्या संघात सामील झाला होता. चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करणारा रवींद्र जाडेजा तिसरा कर्णधार ठरणार आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईचं नेतृत्व केलंय. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघानं 213 पैकी 130 सामने जिंकले आहेत. तर, धोनीच्या गैरहजेरीत सुरेश रैनानं सहा सामन्याचं नेतृत्व केलंय. यातील दोन सामन्यात चेन्नईला विजय मिळवता आलाय.


जाडेजाची आयपीएलमधील कामगिरी
आयपीएलमध्ये रवींद्र जडेजानं आतापर्यंत 200 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 27.11 च्या फलंदाजीच्या सरासरीनं 2 हजार 386 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकाचा समावेश आहे. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 85 षटकार आणि 176 चौकाराची नोंद आहे. जडेजानं आतापर्यंत गोलंदाजीत 30.04 च्या सरासरीनं 127 विकेट्स घेतले आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 7.61 राहिला आहे. जडेजानं आयपीएलमध्ये 3 वेळा चार आणि एकदा पाच विकेट्स घेतल्या आहेत. 


चेन्नई सुपर किंग्सचे शिलेदार - 
रवींद्र जाडेजा (16 कोटी), महेंद्रसिंग धोनी (12 कोटी), मोईन अली (8 कोटी), ऋतुराज गायकवाड (6 कोटी), रॉबिन उथाप्पा (2 कोटी), ड्वेन ब्राव्हो (4.40 कोटी), अंबाती रायुडू (6.75 कोटी), दीपक चहर (14 कोटी), शिवम दुबे (4 कोटी), महिश तिक्षाना (70 लाख), सिमरनजीतसिंग (20 लाख), डेवॉन कॉनवे (1 कोटी), ड्वेन प्रिटोरियस (50 लाख), मिचेल सॅन्टनर (1.90 कोटी), अडम मिल्न (1.90 कोटी), केएम आसिफ (20 लाख), तुषार देशपांडे (20 लाख). शुभ्रांशु सेनापती (20 लाख), मुकेश चौधरी (20 लाख), प्रशांत सोळंकी (1.20 कोटी) ,ख्रिस जॉर्डन (3.60 कोटी), एन जगदीशन (20 लाख), सी. हरी निशांत(20 लाख), भगत वर्मा(20 लाख), राजवर्धन हंगरगेकर (1.50 कोटी)