CSK vs SRH, 1 Innings Highlight :  चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (CSK vs SRH) या आजच्या सामन्यात हैदराबादने एका चांगल्या गोलंदाजीचं दर्शन घडवलं. अखेरच्या काही षटकात थोड्या अधिक धावा गेल्या असल्या तरी 154 धावांमध्ये चेन्नईसारख्या बलाढ्य संघाला रोखण्यात हैदराबादला यश आलं आहे. चेन्नईकडून मोईन अलीने 35 चेंडूत केलेल्या 48 धावा महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर अलीने रायडूसोबत एक चांगली भागिदारी केली. रायडूने 27 चेंडूत 27 धावा केल्या आहेत. त्यानंतर जाडेजाने अखेरच्या काही षटकात 23 धावांची उत्तम खेळी केली. या सर्वामुळे चेन्नईने 154 धावांची धावसंख्या स्कोरबोर्डवर लावली आहे. ज्यामुळे आता विजयासाठी हैदराबादला 155 धावांची गरज आहे.  


आयपीएलच्या आजच्या सामन्यात सुरुवातीला नाणेफेक जिंकत हैदराबादने गोलंदाजी निवडली. हैदराबादकडून ऋतुराज आणि रॉबिनने चांगली सुरुवात केली पण उथप्पा 15 आणि ऋतुराज 16 धावा करुन तंबूत परतल्यानंतर संघ पुन्हा अडचणीत आला. ज्यानंतर मोईन अली (48) आणि रायडूने (27) अप्रतिम भागिदारी केली. अखेर जाडेजाने 23 तर ब्राव्होने नाबाद 8 धावांची खेळी केली. ख्रिस जॉर्डन नाबाद 6 तर धोनी आणि दुबे प्रत्येकी 3 धावा करण्यात यशस्वी राहिले. हैदराबादकडून सुंदर आणि नटराजनने प्रत्येकी दोन तर भुवनेश्वर, मार्को, मार्करम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला. 



चेन्नई अंतिम 11


रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जाडेजा (कर्णधार), एमएस धोनी (विकेटकीपर), शिवम दुबे, डी. ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, महिश तीक्षणा, मुकेश चौधरी


हैदराबाद अंतिम 11 


अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, केन विल्यमसन (कर्णधार) निकोलस पूरन (विकेटकीपर), एडन मार्करम, वॉशिंग्टन सुंदर, शशांक सिंग, मार्को जॅन्सन, भुवनेश्वर कुमार, उम्रान मलिक, टी नटराजन 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha