RR vs RCB : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज पार पडणाऱ्या रॉयल चँलेजर्स बंगळुरु विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) सामन्यात नाणेफेक जिंकत रॉयल चँलेजर्स बंगळुरुने गोलंदाजी निवडली. त्यांनी सुरुवातही उत्तम केली. सुरुवातीचे तीन विकेट्सही बंगळुरुने पटापट घेतले. पण त्यानंतर जोस बटलर आणि फिनिशर शिमरॉन हीटमायर या दोघांनी भक्कम खेळी करत संघाला एक चांगली धावसंख्या करुन दिली. बटलरने नाबाद 70 तर हीटमायरने नाबाद 43 धावा केल्यामुळे राजस्थान 169 धावा करु शकला आहे. ज्यामुळे बंगळुरुला विजयासाठी आता 170 धावांची गरज आहे.


राजस्थान संघाने आतापर्यंत हंगामात सर्वात दमदार कामगिरी केली असून सध्या ते पॉईंट टेबलमध्येही (Point Table) अव्वल स्थानावर आहेत. दुसरीकडे आरसीबी संघाने सुमार कामगिरी केली दोन पैकी एक सामना जिंकला असून एक सामन्यात ते पराभूत झाले आहेत.



बंगळुरुचे अंतिम 11  


फाफ डु प्लेसीस(कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शेरफेन रुदरफोर्ड, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, डेविड विली, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज. 


राजस्थान अंतिम 11 


जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हिटमायर, रियान पराग, रवीचंद्रन आश्विन, नवदीप सैनी, ट्रेन्ट बोल्ट, युझवेंद्र चहल, प्रसिध कृष्णा. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha