Ajinkya Rahane, IPL 2022 : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील कोलकाता संघाची आयपीएलमधील आतापर्यंत कामगिरी दमदार राहिली आहे. गुणतालिकेत कोलकाता संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोलकाताने पाच पैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे.  तर दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोलकाता संघ लयीत दिसतोय, पण मुंबईकर अजिंक्य रहाणेचा फॉर्म कोलकातासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. सलामी फलंदाज अजिंक्य रहाणेला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आलेली नाही. आतापर्यंत झालेल्या पाचही सामन्यात अजिंक्य रहाणे फ्लॉप राहिलाय. त्यामुळे अजिंक्य रहाणेवरुन अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. कोलकात्याच्या चाहत्याने यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. 
 
रहाणेचं निराशाजनक प्रदर्शन 
आयपीएलच्या 15 व्या हंगामात अजिंक्य राहणेची कामगिरी अतिशय निराशाजनक आहे. आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यात रहाणेनं फक्त 80 धावा चोपल्या आहेत. चिंतेची बाब म्हणजे, अजिंक्य रहाणेला 15 व्या हंगामात एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. रहाणेचा स्ट्राईक रेटही फक्त 100 राहिला आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणेला प्लेईंग 11 मध्ये खेळवणार का? याबाबत शंका आहे.  


रहाणेकडून चाहत्यांना मोठ्या आशा -
मागील काही वर्षांपासून अजिंक्य रहाणेला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या कसोटी संघातूनही रहाणेला वगळण्यात आले होते. अजिंक्य रहाणे दणक्यात पुनरागमन करेल, अशी चाहत्यांना आशा आहे. कोलकाताने लिलावात अजिंक्य रहाणेला खरेदी केले आहे. कोलकातालाही अजिंक्य रहाणेकडून मोठ्या आपेक्षा आहेत. अजिंक्य रहाणे या आपेक्षा पूर्ण करणार का? येणाऱ्या काळातच दिसेल. 


हेड टू हेड रेकॉर्ड -
सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स (Sunrisers Hyderabad Vs Kolkata Knight Riders) यांच्यात आज आयपीएल 2022 मधील 25 सामना खेळला जाणार आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत 21 सामन्यांमध्ये हैदराबाद आणि कोलकाता संघ आमनेसामने आले आहेत. या 21 सामन्यांपैकी हैदराबादनं 7 तर कोलकातानं 14 सामने जिंकले आहेत. मागील आकडेवारीच्या आधारे केकेआरचे पारडे जड असल्याचे दिसत आहे.


हे देखील वाचा-