IPL 2021 : टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतने 8 वर्षांनी सैय्यद मुश्ताक अली टुर्नामेंटमार्फत क्रिकेटमध्ये वापसी केली आहे. श्रीसंतच्या नजरा आता इंडियन प्रीमियर लीगचा 14वा सीझन खेळण्यावर आहे. रिपोर्ट्सनुसार, श्रीसंत पुन्हा एकदा आपली आधीचा संघ राजस्थान रॉयल्ससाठी खेळू शकतो. 2013 मध्ये श्रीसंतवर स्पॉट फिक्सिंगमुळे बंदी घालण्यात आली होती.


एक. श्रीसंतने या आयपीएलमध्ये खेळण्यासाठी स्वतः इच्छुक असल्याचं सांगितलं आहे. 18 फेब्रुवारी रोजी इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सीझनसाठी लिलाव करण्यात येणार आहे. असा दावा केला जातोय की, आयपीएलमध्ये वापसी करण्यासंदर्भात श्रीसंत आणि राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन यांच्यात बातचित सुरु आहे.


श्रीसंतने काही दिवसांपूर्वी सैय्यद मुश्ताक अली टुर्नामेंटमध्ये केरळच्या संघातून खेळताना दिसून आला होता. दरम्यान, श्रीसंतची क्रिकेटमध्ये वापसी संजू सॅमसन कर्णधार असताना झाली आहे. संजू सॅमसनवर SMAT मध्ये कर्णधार म्हणून केरळच्या संघाचं नेतृत्त्व केलं होतं.


राजस्थान रॉयल्सला गरज


2013 मध्ये श्रीसंतवर स्पॉट फिक्सिंगमुळे बंदी घालण्यात आली होती. 2020 मध्ये श्रीसंतवर लावण्यात आलेली बंदी उठवण्यात आली. त्याचसोबत क्रिकेटमध्ये श्रीसंतच्या वापसीचा मार्गही मोकळा झाला.


राजस्थान रॉयल्सची नजर एका भारतीय वेगवान गोलंदाजावर आहे. राजस्थानने अंकित राजपूत आणि वरुण अरुणला रिलीज केलं आहे. अशातच श्रीसंतला जोफ्रा आर्चर आणि कार्तिक त्यागी यांच्यासोबत संघात स्थान मिळू शकतं.


श्रीसंतने आयपीएलमध्ये 44 सामने खेळले असून 40 विकेट्स घेतले आहेत. अशातच श्रीसंतने 9 मे 2013 रोजी किंग्स इलेव्हन पंजाबच्या विरोधात आपला शेवटचा सामना खेळला होता. श्रीसंतवर ऑगस्ट 2013ला IPL सामन्यादरम्यान स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीचे आरोप सिद्ध झाल्यानंतर शिक्षा म्हणून BCCI कडून निर्बंध लावण्यात आले होते. ज्याअंतर्गत त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. पण, सर्वोच्च न्यायालयानं मात्र त्याला आरोपमुक्त करत दिलासा दिला आहे.


महत्त्वाच्या बातम्या :