PBKS vs RR Match: आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात आज पंजाब किंग्जचा (PBKS) सामना राजस्थान रॉयल्ससोबत (RR) होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघ हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील आणि आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याची शानदार सुरुवात करतील. दोन्ही संघांनी पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी केली नाही. परंतु, आता ते नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील. पंजाब किंग्जची कमान केएल राहुलच्या हाती आहे, तर राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व संजू सॅमसनकडे आहे. दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकॉर्डवर एक नजर टाकूया.
PBKS विरुद्ध RR हेड टू हेड
आयपीएलमध्ये आतापर्यंत राजस्थान आणि पंजाबच्या संघांमध्ये एकूण 22 सामने खेळले गेले आहेत. यात 12 सामन्यांमध्ये राजस्थानने विजय मिळवला आहे, तर पंजाब संघाने 10 सामने जिंकले आहेत. या रेकॉर्डनुसार राजस्थान संघ वरचढ दिसत आहे.
पंजाबची ताकद
पंजाब किंग्ज संघाची फलंदाजी खूप मजबूत आहे. संघाची फलंदाजी संघाचा कर्णधार केएल राहुल, मयंक अग्रवाल, ख्रिस गेल आणि निकोलस पूरनवर अवलंबून आहे. हे सर्वजण जागतिक दर्जाचे फलंदाज आहेत आणि त्यांनी गेल्या मोसमात उत्तम कामगिरी केली. गोलंदाजीमध्ये मोहम्मद शमी गोलंदाजीचे नेतृत्व करेल. अर्शदीप सिंग आणि रवी बिष्णोई यांच्याकडूनही मोठ्या आशा आहेत, ज्यांनी गेल्या मोसमात चांगली कामगिरी केली.
राजस्थान रॉयल्सची ताकद
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन पंजाबविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याच्याशिवाय एविन लुईस, लियाम लिव्हिंगस्टोन आणि शिवम दुबे हे संघाचे मुख्य फलंदाज आहेत. गोलंदाजीमध्ये मुस्तफिजुर रहमान, जयदेव उनाडकट आणि ख्रिस मॉरिसवर लक्ष केंद्रित केले जाईल. मात्र, सर्वांच्या नजरा राहुल तेवतियावर आहेत, ज्याने गेल्या मोसमात अनेक सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली. गोलंदाजी व्यतिरिक्त, फलंदाजीतही चांगली कामगिरी करण्यास सक्षम आहे.
आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्याचे संपूर्ण वेळापत्रक (IPL 2021 Second Phase Mumbai Indians Schedule)
- 19 सप्टेंबर - चेन्नई सुपर किंग्ज वि. मुंबई इंडियन्स ( सायं. 7.30)
- 20 सप्टेंबर - कोलकाता नाईट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू ( सायं. 7.30)
- 21 सप्टेंबर - पंजाब वि.राजस्थान रॉयल्स ( सायं. 7.30)
- 22 सप्टेंबर - दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायजर्स हैदराबाद ( सायं. 7.30)
- 23 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट रायडर्स ( सायं. 7.30)
- 24 सप्टेंबर- रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु वि. चेन्नई सुपर किंग्ज ( सायं. 7.30)
- 25 सप्टेंबर - दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स (दुपारी 3.30)
- सनरायजर्स हैदराबाद वि. पंजाब किंग्ज ( सायं. 7.30)
- 26 सप्टेंबर - चेन्नई सुपर किंग्ज वि. कोलकाता नाईट रायडर्स (दुपारी 3.30)
- रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू वि. मुंबई इंडियन्स ( सायं. 7.30)
- 27 सप्टेंबर - सनरायजर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स ( सायं. 7.30)
- 28 सप्टेंबर - कोलकाता नाईट रायडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स (दुपारी 3.30)
- मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्ज ( सायं. 7.30 )
- 29 सप्टेंबर - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळूरू ( सायं. 7.30 )
- 30 सप्टेंबर - सनरायजर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्ज ( सायं. 7.30 )
- 1 ऑक्टोबर - कोलकाता नाईट रायडर्स वि. किंग्ज पंजाब ( सायं. 7.30 )
- 2 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स (दुपारी 3.30)
- राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्ज ( सायं. 7.30)
- 3 ऑक्टोबर - रॉयल चॅलेंजर्स वि. पंजाब किंग्ज (दुपारी 3.30)
- कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायजर्स हैदराबाद ( सायं. 7.30)
- 4 ऑक्टोबर - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्ज ( सायं. 7.30)
- 5 ऑक्टोबर - राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स ( सायं. 7.30)
- 6 ऑक्टोबर - रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु वि, सनरायजर्स हैदराबाद ( सायं. 7.30)
- 7 ऑक्टोंबर - चेन्नई सुपर किंग्ज वि. पंजाब किंग्ज (दुपारी 3.30)
- कोलकाता नाईट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स ( सायं. 7.30)
- 8 ऑक्टोबर - सनराजर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स (दुपारी 3.30)
- रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू वि. दिल्ली कॅपिटल्स (दुपारी 3.30)
- 10 ऑक्टोबर - क्वालीफायर 1
- 11 ऑक्टोबर - एलीमिनेटर
- 13 ऑक्टोबर - क्वालीफायर 2
- 15 ऑक्टोबर फायनल