KKR vs RCB, Match Highlights : आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसरा सामना आज शेख झायेद स्टेडियमवर खेळवण्यात आला. विराट कोहलीच्या बंगळुरुची  दुसऱ्या टप्प्यातील  सुरुवात निराशाजनक झाली. मॉर्गनच्या कोलकाता संघाने  धुव्वा उडवला. कोलकाताने बंगळुरुवर नऊ विकेटनी मात केली. कोलकाताने 10 षटक राखून बंगळुरुचे आव्हान पूर्ण केले.


कोलकाताने 10 षटकात 93 धावाचे लक्ष्य सहज मिळवले. शुभमन गिलने 48 आणि व्यंकटेश अय्यर नाबाद 41 धावा केल्या. बंगळुरकडून यजुवेंद्र चहलने एक विकेट घेतले. शुभमनने 6 चौकार आणि एका षटकारासह 48 धावा केल्या.


कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध होणारा सामना हा विराट कोहलीच्या आयपीएल कारकिर्दीतील 200 वा सामना होता. RCB ला पहिला झटका दहाव्या धावांवर पहिला धक्का दिला. कोहलीला प्रसिद्ध कृष्णाने  5 धावांवर  lbw बाद केले. पडिक्कल बाद झाल्यानंतर संघाला उतरती कळा लागली. डिव्हिलियर्स, मॅक्सवेल हे स्टार फलंदाजही काही करू शकले नाही. आंद्रे रसेल आणि फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 3 तर लॉकी फर्ग्युसनने 2 बळी घेत बंगळुरुचा डाव 92 धावांवर संपुष्टात आणला. 


कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध होणारा सामना हा विराट कोहलीच्या आयपीएल कारकिर्दीतील 200 वा सामना होता. हा सामना खेळताच तो आयपीएल स्पर्धेत 200 सामने खेळणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी असा कारनामा चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी, सुरेश रैना, मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि कोलकाताचा खेळाडू दिनेश कार्तिक याने केला आहे.


आरसीबीची प्लेइंग इलेव्हन : देवदत्त पडिक्कल, विराट कोहली (कर्णधार), रजत पाटिदार, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, शाहबाज अहमद , वानिंदू हसरंगा, काईल जेमीसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल.


केकेआर : इयॉन मॉर्गन (कर्णधार), गुरकीरत सिंह मान, करुण नायर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, कुलदीप यादव,  एम. प्रसिद्ध कृष्णा,, टिम साउदी, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, शाकिब अल हसन, सुनील नारायण