IPL 2021, MI vs RR : गतवर्षाचा चॅम्पियन मुंबईचा संघ गुरुवारी आयपीएल 2021च्या 24व्या सामन्यात रॉजस्थानशी भिडणार आहे. दोन्ही संघांमध्ये हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. मुंबईच्या संघाला 5 सामन्यांपैकी 2 सामन्यांमध्ये विजय मिळाला असून 3 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे मुंबईचा संघ पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. राजस्थानचा संघानेही 5 पैकी 2 सामन्यांत विजय मिळाला असून तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे राजस्थानचा संघ पॉईंट टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे. अशातच दोन्ही संघ विजय मिळवण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करताना दिसणार आहेत. यंदाच्या सीझनमधील दोन्ही संघांचा हा सहावा सामना असणार आहे.
विजय मिळवण्यासाठी मुंबईचा प्रयत्न
मुंबईचा संघ अनेक दिवसांच्या ब्रेकनंतर मैदानावर वापसी करण्यासाठी सज्ज आहे. मुंबईला गेल्या दोन सामन्यांमध्ये परभवाचा सामना करावा लागला होता. अशातच आजच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी मुंबईचे शिलेदार कसून प्रयत्न करताना दिसणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात खेळणारा मुंबईचा संघ राजस्थान विरोधात विजय मिळवण्यासाठी काय रणनिती आखणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मुंबईच्या संघाची मधली फळी फारशी उत्तम खेळी करु शकलेली नाही. त्यामुळे दिल्लीच्या मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यात त्यांच्याकडून अपेक्षा आहेत.
राजस्थानसमोर मुंबईचं आव्हान
राजस्थान रॉयल्सचे दोन दिग्गज खेळाडू बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर दुखापतग्रस्त असल्यामुळे संघाबाहेर आहेत. राजस्थानच्या संघाला सध्या दोन खेळाडूंची कमतरता भासत आहे. ज्याचा परिणाम त्यांच्या खेळावरही होत आहे. राजस्थान रॉयल्सने आपल्या गेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरोधात 6 विकेट्सनी विजय मिळवला होता. अशातच संजू सॅमसनच्या नेतृत्त्वात खेळणारा संघ आपली विजय घोडदौड सुरु ठेवण्याच्या प्रयत्नात असेल. परंतु, राजस्थानच्या संघाला मुंबईच्या बोल्ट आणि बुमराहच्या घातक गोलंदाजीचं आव्हान पार करावं लागणार आहे.
मुंबईचा संभाव्य संघ : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, कीरोन पोलार्ड, जयंत यादव, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट
राजस्थानचा संभाव्य संघ : यशस्वी जायसवाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), रियान पराग, डेविड मिलर, शिवम दुबे, राहुल तेवतिया, क्रिस मॉरिस, जयदेव उनादकट, मुस्तफिजुर रहमान, चेतन सकारिया
महत्त्वाच्या इतर बातम्या :