IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग सीझन 14 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सची गुरुवारी मुंबई इंडियन्सशी लढत होईल. आयपीएल 14 च्या उत्तरार्धात केकेआरने आरसीबीला हरवून चांगली सुरुवात केली आहे. मात्र, मुंबई इंडियन्सविरुद्धचा त्यांचा खराब रेकॉर्ड पाहता, केकेआरचा संघ प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल करणार नाही.


केकेआरचा मुंबई इंडियन्सविरुद्धचा रेकॉर्ड अतिशय वाईट आहे. आयपीएलच्या इतिहासात केकेआरने आतापर्यंत 28 वेळा मुंबई इंडियन्सचा सामना केला आहे. या 28 सामन्यांमध्ये केकेआरने 6 सामने जिंकले आहेत, तर 22 सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.


शुभमन गिलचे पुनरागमन केकेआरसाठी मोठा दिलासा देणारे ठरले आहे. आरसीबीविरुद्ध गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर शुभमन गिलने 48 धावांची खेळी खेळली. यासह, शुभमन गिलला वेंकटेश अय्यरमध्ये एक चांगला जोडीदार मिळत असल्याचे दिसते, ज्याने आरसीबीविरुद्ध नाबाद 41 धावा केल्या.


केकेआरचे गोलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये
केकेआरसाठी मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. केकेआरने आतापर्यंत आयपीएल 14 मध्ये आठ सामने खेळले आहेत, त्यापैकी ते फक्त तीन जिंकले आहेत. जर केकेआरने आजचा सामना गमावला, तर त्यांना प्लेऑफमध्ये जाणे खूप कठीण होईल.


मात्र, केकेआरचे गोलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहेत. RCB ला KKR ने त्याच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर 92 धावांवर ऑलआऊट झाला. केकेआर या सामन्यात वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल यांच्याकडूनही त्याच प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा करेल.


प्लेईंग इलेव्हन 11
केकेआर: शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, इयोन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, सुनील नारायण, लोकी फर्ग्युसन, प्रणली कृष्णा आणि वरुण चक्रवर्ती.


आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्याचे संपूर्ण वेळापत्रक  (IPL 2021 Second Phase Mumbai Indians Schedule) 



  • 19 सप्टेंबर - चेन्नई सुपर किंग्ज वि. मुंबई इंडियन्स ( सायं. 7.30)

  • 20 सप्टेंबर - कोलकाता नाईट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू ( सायं. 7.30)

  • 21 सप्टेंबर -  पंजाब वि.राजस्थान रॉयल्स ( सायं. 7.30)

  • 22 सप्टेंबर - दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायजर्स हैदराबाद ( सायं. 7.30)

  • 23 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट रायडर्स ( सायं. 7.30)

  • 24 सप्टेंबर-  रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु वि. चेन्नई सुपर किंग्ज ( सायं. 7.30)

  • 25 सप्टेंबर - दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स (दुपारी 3.30)

  • सनरायजर्स हैदराबाद वि. पंजाब किंग्ज ( सायं. 7.30)

  • 26 सप्टेंबर - चेन्नई सुपर किंग्ज वि. कोलकाता नाईट रायडर्स  (दुपारी 3.30)

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू वि. मुंबई इंडियन्स  ( सायं. 7.30)

  • 27 सप्टेंबर - सनरायजर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स  ( सायं. 7.30)

  • 28 सप्टेंबर - कोलकाता नाईट रायडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स  (दुपारी 3.30)

  • मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्ज  ( सायं. 7.30 )

  • 29 सप्टेंबर - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळूरू ( सायं. 7.30 )

  • 30 सप्टेंबर - सनरायजर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्ज ( सायं. 7.30 )

  • 1 ऑक्टोबर - कोलकाता नाईट रायडर्स वि. किंग्ज पंजाब   ( सायं. 7.30 )

  • 2 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स  (दुपारी 3.30)

  • राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्ज    ( सायं. 7.30)

  • 3 ऑक्टोबर - रॉयल चॅलेंजर्स वि. पंजाब किंग्ज   (दुपारी 3.30)

  • कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायजर्स हैदराबाद ( सायं. 7.30)

  • 4 ऑक्टोबर - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्ज  ( सायं. 7.30)

  • 5 ऑक्टोबर - राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स   ( सायं. 7.30)

  • 6 ऑक्टोबर - रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु वि, सनरायजर्स हैदराबाद ( सायं. 7.30)

  • 7 ऑक्टोंबर - चेन्नई सुपर किंग्ज वि. पंजाब किंग्ज  (दुपारी 3.30)

  • कोलकाता नाईट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स  ( सायं. 7.30)

  • 8 ऑक्टोबर - सनराजर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स  (दुपारी 3.30)

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू वि. दिल्ली कॅपिटल्स  (दुपारी 3.30)

  • 10 ऑक्टोबर - क्वालीफायर 1

  • 11 ऑक्टोबर - एलीमिनेटर

  • 13 ऑक्टोबर - क्वालीफायर 2

  • 15 ऑक्टोबर फायनल