IPL 2021, Rajasthan Vs Chennai | आयपीएल 2021 चा 12 वा सामना चेन्नई आणि राजस्थान यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून रंगणार आहे. यापूर्वीच्या दोन्ही सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी विजय मिळवला आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघ विजयाची लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. शेवटच्या सामन्यात चेन्नईने पंजाबचा पराभव केला. तर राजस्थानने दिल्लीला पराभूत केले होते.


चेन्नई वेगवान गोलंदाज दीपक चहरने पंजाबविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे आजच्या सामन्यातही त्यांची गोलंदाजी निर्णायक ठरु शकते. राजस्थानला आज दीपक चहरच्या गोलंदाजीचा सामना करावा लागणार आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने पहिल्यात सामन्यात शतक झळकावलं होतं, मात्र मागील सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे चेन्नईविरोधात त्याला चांगली फलंदाजी करावी लागेल. कारण जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीत राजस्थानची गोलंदाजीची ताकद कमी झाली आहे. 


चेन्नई आणि राजस्थान यांच्यात आजवर झालेल्या सामन्यांवर नजर टाकल्यास चेन्नई पुढे आहे. दोन्ही संघ आतापर्यंत 23 वेळा समोरासमोर आले आहेत. त्यापैकी चेन्नईने 14 वेळा विजय मिळवला आहे. त्याचबरोबर राजस्थानने केवळ 9 सामना जिंकला आहेत. मात्र आयपीएल 2020 मध्ये राजस्थान संघाने चेन्नईवर वर्चस्व होतं.


लुंगी नागिदी संघात सामील


दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी नागिदी फिट असल्यामुळे चेन्नई संघात दाखल झाला आहे. मात्र धोनीला विनिंग कॉम्बिनेशन सोबत छेडछाड करायला आवडणार नाही. अशा परिस्थितीत नागिदीला बाहेर बसावं लागू शकतं. तसेच राजस्थानही आपल्या संघात फार बदल करेल याची शक्यता कमीच आहे. 


मुंबईच्या वानखेडे स्टेडियमची ही खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त आहे. दिल्ली आणि पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात येथे फलंदाजी करणे सोपं दिसत होतं. अशा परिस्थितीत हाय स्कोरिंग मॅच येथे पाहायला मिळू शकते.  टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो.


चेन्नईचा संभाव्य संघ - ऋतुराज गायकवाड, फाफ डू प्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सॅम करन, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर.


राजस्थानचा संभाव्य संघ - जोस बटलर, मनन वोहरा, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, शिवम दुबे, रायन पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, जयदेव उनादकट, मुस्तफिजुर रहमान आणि चेतन सकरिया.