IPL 2021 Finale, KKR vs CSK :  कोलकाचा नाईट रायडर्सनं बुधवारी झालेल्या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला मात देत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आजा 15 ऑक्टोबर रोजी हा किताब जिंकण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि कोलकाताचा संघ एकमेकांविरोधात खेळताना दिसणार आहे. 


कोलकाता (KKR) विरुद्ध दिल्लीत खेळवण्यात आलेल्या रोमांचक लढतीत दिल्ली कॅपिटल्सला मात दिली. यासोबतच कोलकाताचा संघ आयपीएल 2021 च्या फायनलमध्ये पोहोचला आहे. आता 15 ऑक्टोबरला आयपीएल 2021 चा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात चेन्नई आणि कोलकाता एकमेकांविरोधात उभे ठाकणार आहेत. 



आज आयपीएलचा इतिहास पाहिला तर, कोलकातानं दोन वेळा किताब जिंकला आहे. 2014, 2012 मध्ये कोलकातानं आयपीएलचा किताब जिंकलाय होता. खास गोष्ट म्हणजे, कोलकातानं जेव्हाही फायनल्समध्ये धडक दिली आहेस, त्या-त्या वेळी कोलकातानं आयपीएलच्या किताबावर आपलं नाव कोरलं आहे.  


कोलकाताचा आयपीएल (IPL 2021) मधील प्रवास  


1. 2020- पांचवं स्थान 
2. 2019- पांचवं स्थान 
3. 2018- क्वॉलिफायर 2 
4. 2017- क्वॉलिफायर 2 
5. 2016- एलिमिनेटर 
6. 2015- पांचवं स्थान 
7. 2014- चॅम्पियन 
8. 2013- सातवं स्थान 
9. 2012- चॅम्पियन 
10. 2011- एलिमिनेटर 
11. 2010- सहावं स्थान 
12. 2009- आठवं स्थान 
13. 2008- सहावं स्थान 


व्यंकटेश अय्यर आणि शुभमन गिल ठरले स्टार 


कोलकाताच्या विजयचा शिल्पकार वेंकटेश अय्यर आहे. अय्यरने  चार चौकार आणि तीन षटकारासह  41 बॉलमध्ये 55  धावा केल्या आहे. राहुल त्रिपाठीने मोक्याच्या क्षणी षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला आहे. आयपीएल 2014 प्रमाणे संघ पुन्हा एकदा किताब जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. 


खासकरुन यूएईमधील आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यरची जोडी KKR च्या संघाला पुढे घेऊन आली. या सीझनमध्ये केकेआरकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांची नावं आहेत. 


• शुभमन गिल : 427 रन 
• राहुल त्रिपाठी : 395 
व्यंकटेश अय्यर : 320 रन


कोलकाताचा कर्णधार इयॉन मोर्गननं सामना संपल्यानंतर म्हटलं की, आम्ही आमचा रेकॉर्ड कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. परंतु, चेन्नईचं आव्हानंही सोपं नसणार आहे. चेन्नईनं अनेकदा फायनल्समध्ये स्थान मिळवलं असून अनेकदा आयपीएलचा किताबही पटकावला आहे. अशातच 15 तारखेचा सामना जिंकण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत."


महत्त्वाच्या इतर बातम्या :