IPL 2021 CSK: महेंद्रसिंग धोनीची (Mahendra Singh Dhoni) गणना जगातील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये केली जाते. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या. तरीही माही थांबला नाही, त्याने आता आयपीएलमध्येही आपले कर्णधारपद सिद्ध केले आहे आणि चेन्नईला तीन वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा चेन्नई 15 ऑक्टोबरला आयपीएलचा अंतिम सामना 9 व्या वेळा खेळणार आहे. या सामन्यात माही आयपीएलमधील सर्वात वयस्कर खेळाडू आणि कर्णधार होण्याचा विक्रमही करेल. यासह धोनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे.


आयपीएलमधील सर्वात वयस्कर कर्णधार
या प्रकरणात धोनीने अनेक कर्णधारांना मागे सोडले आहे. त्याने 40 वर्षे आणि 95 दिवसांच्या वयात क्वालीफायरमध्ये प्रवेश केलाय. उद्या म्हणजे शुक्रवारी, जेव्हा तो आयपीएल फायनल (IPL Final 2021) खेळायला येईल, तेव्हा त्याचे वय 40 वर्षे आणि 100 दिवस असेल. राहुल द्रविडने 40 वर्षे 133 दिवसांच्या वयात कर्णधार म्हणून आयपीएलचा सामना खेळण्याचा विक्रम 2013 मध्ये केला होता.



200 सामन्यांमध्ये कर्णधारपदाचा विक्रम
एमएस धोनी आयपीएलच्या 200 सामन्यांमध्ये कर्णधार होणारा पहिला खेळाडू ठरला आहे. यासोबतच एका फ्रँचायझीसाठी इतके दिवस राहण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. तो आयपीएलमधील सर्वात जास्त कप्तानी करणारा कर्णधार बनला आहे आणि या प्रकारात त्याच्या आसपास कोणीही नाही.



तीन वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली
धोनीने 2010, 2011 आणि 2018 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली. एवढेच नाही तर यासह चेन्नई पाच वेळा उपविजेताही राहिला आहे. 2008 मध्ये तिने फायनल खेळली पण ती जिंकू शकली नाही. 2012, 2013 मध्ये ती उपविजेतीही होती. 2015 मध्ये तिला पुन्हा जेतेपदा हुलाकवणी दिली, ती 2019 मध्येही विजेतेपद मिळवू शकली नाही. आयपीएलच्या 202 सामन्यांच्या धोनीच्या कर्णधारपदाच्या रेकॉर्डवर नजर टाकली, तर त्याने 120 सामने जिंकले आहेत, तर 82 सामन्यात त्याला पराभव पत्करावा लागला आहे. एक सामना असा झाला की ज्याचा निकाल लागला नाही.