Indian Premier League: आयपीएल 2021 च्या दुसऱ्या हाफ सुरु होण्यास 24 तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. आयपीएल 2021 च्या उत्तरार्धातील पहिला सामना उद्या म्हणजेच रविवारी दुबईमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाईल. तत्पूर्वी, भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी रिप्लेसमेंटची अंतिम यादी जाहीर केली आहे.


दुसऱ्या टप्प्यात दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी आपले संघ बदलले आहेत. काही बदल आधीच घोषित करण्यात आले आहेत तर काहींची नावं स्पर्धा पुन्हा सुरू होण्याच्या एक दिवस आधी देण्यात आले होते.


ख्रिस वोक्सच्या जागी दिल्लीने बेन ड्वारशुईसचा समावेश केला आहे. याशिवाय फ्रँचायझीने वेगवान गोलंदाज एम सिद्धार्थच्या जागी कुलवंत खेजरोलियाला संघात घेतले आहे. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने अॅडम झांपाच्या जागी वनिंदू हसारंगा, डॅनियल सॅमच्या जागी दुश्मंता चामीरा, केन रिचर्डसनच्या जागी जॉर्ज गार्टन, फिन एलनच्या जागी टीम डेव्हिड आणि वॉशिंग्टन सुंदरच्या जागी आकाश दीप यांचा समावेश केला आहे.


रिप्लेसमेंटची संपूर्ण यादी


दिल्ली कॅपिटल्स: एम सिद्धार्थच्या जागी कुलवंत खेजरोलिया आणि ख्रिस वोक्सच्या जागी बेन ड्वारशुईस.


मुंबई इंडियन्स: मोहसीन खानच्या जागी रुश कलारिया.


पंजाब किंग्ज: रिले मेरेदिथच्या जागी नॅथन एलिस, झाय रिचर्डसनच्या जागी आदिल रशीद आणि डेव्हिड मलानच्या जागी एडन मार्करम.


राजस्थान रॉयल्स: अँड्र्यू टायच्या जागी तबरेज शम्सी, जोफ्रा आर्चरच्या जागी ग्लेन फिलिप्स, बेन स्टोक्सच्या जागी ओशाने थॉमस आणि जोस बटलरच्या जागी एविन लुईस.


रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: अॅडम झम्पाच्या जागी वनिंदु हसारंगा, डॅनियल सॅम्सच्या जागी दुश्मंता चमिरा, केन रिचर्डसनच्या जागी जॉर्ज गार्टन, फिन एलनच्या जागी टीम डेव्हिड आणि वॉशिंग्टन सुंदरच्या जागी आकाश दीप.


सनरायझर्स हैदराबाद: जॉनी बेअरस्टोच्या जागी शरफने रदरफोर्ड.