CSK vs SRH Match Preview : IPL 2021 मध्ये आज चेन्नईचा सामना हैदराबादशी होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. आजच्या सामन्यात धोनीचा संघ आपली विजयी घोडदौड सुरु ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर डेविड वॉर्नरच्या नेतृत्त्वात खेळणारा संघ यंदाच्या वर्षातील आपल्या पराभवाची मालिका तोडण्याचा प्रयत्न करणार आहे. 


चेन्नईचा संघ यंदाच्या सीझनमध्ये फॉर्मात असल्याचं दिसून येत आहे. चेन्नईचा सलामीचे फलंदाज फाफ डू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड दोघेही गेल्या काही सामन्यांपासून संघाला उत्तम सुरुवात करुन देण्यात यशस्वी ठरत आहेत. सुरेश रैनाही संघासाठी उत्तम खेळी करत आहे. त्याचसोबत संघातील ऑलराऊंडर खेळाडू रविंद्र जाडेजाही अविश्वनीय खेळी करत आहे. त्यामुळे चेन्नईचं आव्हान भेदणं हैदराबादसाठी कठिण असणार आहे. चेन्नईच्या गोलंदाजांची फळही धमाकेदार खेळी करत आहे. वेगवान गोलंदाज दीपक चहर, शार्दुल ठाकूर याव्यतिरिक्त ऑलराऊंडर सॅम करन संघाला उत्तम बॅलेंस देत आहे. स्पिनर्सबाबत बोलायचं झालं तर ऑलराऊंडर खेळाडू रविंद्र जाडेजा उत्तम खेळी करताना दिसत आहे. चेन्नईने गेल्या सामन्यात इमरान ताहिरला संधी दिली होती. धमाकेदार खेळी करत त्यानं सर्वांची मनं जिंकली. त्यामुळे आज दिल्लीतील मैदानावरही तो संघासाठी फायदेशीर ठरु शकतो. पण जर मोईन अली फिट असेल तर मात्र कदाचित इमरानला संघात स्थान मिळू शकणार नाही. 


हैदराबादपुढं करो या मरोची स्थिती


हैदराबादच्या संघासाठी आजचा सामना म्हणजे करो या मरोची स्थिती आहे. आतापर्यंतच्या खेळात हैदराबादला पाच सामन्यांपैकी केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या सीझनमध्ये संघाची कामगिरी अत्यंत खराब दिसून येत आहे. वॉर्नर आणि बेयरस्टो देखील अपेक्षेसारखी कामगिरी करण्यात असमर्थ ठरले आहेत. केन विलियम्सनवर मधल्या फळीची संपूर्ण जबाबदारी आहे. गेल्या सामन्यात कर्णधार वॉर्नर मनीष पांडेला संघाबाहेर बसवण्याच्या संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर नाखूश असल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे या सामन्यात मनीष पांडेची वापसी होऊ शकते. 


चेन्नईचा संभाव्य संघ : ऋतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, सुरेश रैना, मोईन अली, अंबाती रायडू, रविंद्र जाडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर/कर्णधार), सॅम करन, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर


हैदराबादचा संभाव्य संघ : डेविड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), केन विलियमसन, मनीष पांडे, विजय शंकर, केदार जाधव, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, जगदीश सुचित, खलील अहमद, सिद्धार्थ कौल


महत्त्वाच्या इतर बातम्या :