मुंबई : गुरुवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या सातव्या सामन्यात राजस्थानने दिल्लीचा तीन विकेट्नी पराभव केला. पण या सामन्याने आयपीएलच्या इतिहासात एक अनोखा विक्रम केलाय. दिल्लीच्या संघाला फलंदाजी करताना एकही षटकार मारता आला नाही. आयपीएलच्या इतिहासात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा पहिलाच सामना आहे की एखाद्या संघाला त्याच्या इनिंगमध्ये एकही षटकार मारता आला नाही. हा या स्टेडियमवरचा एक इतिहास ठरलाय.


आयपीएलमध्ये आतापर्यंत बेंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमनंतर वानखेडेवर सर्वात जास्त षटकार मारण्यात आले आहेत. दिल्लीच्या संघात पृथ्वी शॉ, शिखर धवन, ऋषभ पंत आणि मार्क स्टोयनिस यांच्यासारखे विस्फोटक फलंदाज असताना दिल्लीला एकही षटकार मारता आला नाही हे विशेष. दिल्लीने या सामन्यात 20 चौकार मारले असून त्यापैकी 9 चौकार हे कर्णधार ऋषभ पंतच्या नावे आहेत. राजस्थानच्या जयदेव उनादकट, चेतन सरारिया आणि मुस्ताफिजुर रहमान या गोलंदाजांनी चांगलं प्रदर्शन करत दिल्लीच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करू दिली नाही. 


आयपीएल 2021 च्या आजच्या सातव्या सामन्यामध्ये राजस्थानने दिल्लीवर तीन विकेटने विजय मिळवला आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतच्या अर्धशतकाच्या बळावर दिल्लीनं राजस्थानसमोर 148 धावांचं आव्हान ठेवलं होतं. फलंदाजीसाठी प्रथम मैदानात उतरलेल्या दिल्लीला 20 षटकात 8 बाद 147 धावा करता आल्या. त्यानंतर राजस्थानच्या फलंदाजांनी दिल्लीने दिलेलं आव्हान अखेरच्या षटकात पूर्ण केलं. ख्रिस मॉरीसने अखेरच्या दोन षटकात केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थानने या हंगामातील पहिला सामना जिंकला आहे.


 




महत्वाच्या बातम्या :