IPL 2020 : इंडियन प्रीमियर लीग सीझनमध्ये मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात हैदराबादने दिल्लीवर मात केली. यानंतर आयपीएलच्या पॉइंट टेबलमध्ये मात्र मोठे बदल झाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा संघ कालच्या सामन्यातील पराभवानंतर पहिल्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर यंदाच्या मोसमातील पहिला विजय मिळवणारा हैदराबादचा संघ आठव्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तसेच राजस्थान रॉयल्स सामना न खेळताच पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.


पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ सध्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवत सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. राजस्थान हा एकमेव असा संघ आहे. ज्याने आतापर्यंत पराभव केला नाही. तसेच आपला तिसरा सामना हरलेली दिल्ली आता दुसऱ्या क्रमांकावर आणि बंगलोर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत.


किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ चौथ्या, तर रोहित शर्मा नेतृत्त्व करत असलेला मुंबई इंडियन्स पाचव्या क्रमांकावर आहे. सनरायझर्स हैदराबादला मंगळवारी आपला पहिला विजय मिळाला. तीन सामन्यांतील एक विजय आणि चांगल्या रन रेटच्या आधारावर हा संघ थेट सहाव्या स्थानावर पोहोचला.


कोलकत्ता नाइट रायडर्स सातव्या क्रमांकावर आहे. पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटच्या क्रमांकावर पोहोचली आहे. धोनी नेतृत्त्व करत असलेली चेन्नई सुपर किंग्स खराब रन रेटमुळे आणि तिनपैकी फक्त एकाच सामन्यात विजय मिळवल्यामुळे सर्वात शेवटच्या क्रमांकावर पोहोचली आहे.


ऑरेंज आणि पर्पल कॅप


मंगळवारी झालेल्या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या स्थितीत कोणताच बदल झालेला नाही. किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुल 222 धावांसह ऑरेंज कॅपचा दावेदार आहे. तसेच मयंक अग्रवाल दुसऱ्या आणि डुप्लेसिस तिसऱ्या क्रमांकावर आहे.


दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू रबाडाने मंगळवारी झालेल्या सामन्यात शमीला मागे टाकत पर्पल कॅप आपल्याकडे घेतली आहे. रबाडाने 7 विकेट्स घेत पर्पल कॅप आपल्याकडे घेतली आहे. शमीने सुद्धा 7 विकेट्स घेतल्या आहेत. पण त्याचा इकॉनॉमी रेट रबाडाहून अधिक आहे.