IPL 2020 RCB vs MI, Match Preview : आयपीएल 2020 मधील 10वा सामना आज रॉयल चॅलेंजर बंगलोर आणि मुंबई इंडियन्समध्ये संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी दुबईतील इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये रंगणार आहे. बंगलोरला आधीच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाब विरूद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. तर मुंबई इंडियन्सने आपला मागचा सामना जिंकला होता. या सीझनमध्ये दोन्ही संघांच्या पारड्यात एक-एक विजय आणि एक-एक पराभव आहे. त्यामुळे आज रंगणाऱ्या सामन्यात विजयाला गवसणी घालण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करताना दिसणार आहेत. तसेच आजच्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यां दोन दिग्गज खेळाडूंच्या नेतृत्त्व गुणांचा कस लागणार आहे.
RCB आणि MI दोन्ही संघांची ताकद म्हणजे, त्यांचे फलंदाज. बंगलोरकडे विराट कोहली, आरोन फिंच, देवदत्त पड्डिकल, जोश फिलिप आणि एबी डिविलियर्स यांसारखे दिग्गज खेळाडू आहेत. तसेच मुंबईकडे रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, क्विंटन डिकॉक, सुर्यकुमार यादव, कीरन पोलार्ड आणि सौरभ तिवारी यांसारखे खेळाडू आहेत.
Weather Report - कसं असणार हवामान?
दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यांमध्ये हवामान स्वच्छ असणार आहे. दरम्यान, खेळाडूंना येथेही भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. त्याचसोबत येथे दव अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे टॉस जिंकणाऱ्या संघ पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
रॉयल चॅलेंजर बंगलोरचा संभाव्य संघ
रॉयल चॅलेंजर बंगलोर : देवदत्त पडिक्कल, आरोन फिंच, विराट कोहली (कर्णधार), एबी डिविलियर्स, शिवम दूबे, जोश फिलिप/मोइन अली, इसुरु उदाना, वाशिंगटन सुंदर, नवदीप सैनी, उमेश
यादव, और युजवेंद्र चहल.
मुंबई इंडियंसचा संभाव्य संघ
मुंबई इंडियंस : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डि कॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, हार्दिक पांड्या, कीरोन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, ट्रेंट बोल्ट, जेम्स पैटिंसन, राहुल चहर आणि जसप्रीत बुमराह.