MI vs RCB : आयपीएल २०२० चा 48 वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात आज सायंकाळी 7.30 वाजल्यापासून अबुधाबीच्या शेख जायद इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. गेल्या दोन सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत मुंबईला आरसीबीविरुद्धच्या विजय महत्वाचा ठरणार आहे. तर दुसरीकडे, चेन्नईकडून मिळालेल्या पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आजचा सामना जिंकून पॉईंट टेबलवर टॉप करण्यास उत्सुक आहे.


दुखापतीमुळे रोहित शर्मा आयपीएल मधील सलग तिसऱ्या सामन्याला मुकणार आहे. मुंबईचा संघ किरॉन पोलार्डच्या नेतृत्वात खेळेल. अशा वेळी ईशान किशन सलामीला फलंदाजीसाठी मैदानात उतरेल. तर तिकडे आरसीबीसुद्धा कोणताही बदल न करता खेळण्यासाठी उतरेल. तरीही प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील कडवी झुंज बुधवारी पाहायला मिळेल.


राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करल्यानंतरही 14 गुणांसह मुंबईचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून पराभूत झालेल्या बंगलोरचा संघही 14 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ‘आयपीएल’ गुणतालिकेत सुरक्षित असलेल्या या संघांपैकी जो संघ जिंकेल, तो बाद फेरीमधील स्थान पक्के करणार आहे.


Weather Report - हवामान कसे असेल?


अबुधाबीच्या शेख जायद इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात हवामान पूर्णपणे क्लिअर असेल. दरम्यान, खेळाडूंना येथे उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत टॉस जिंकणारा संघ प्रथम फलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो.


Pitch Report खेळपट्टी कशी असेल?


शारजाह इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियमच्या तुलनेने अबुधाबीचं शेख जायद इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम वेगळं आहे. आकाराच्या बाबतीत हे खूप मोठं मैदान आहे. या पीचवर बॉल खूप थांबून येतो. अशा परिस्थितीत दोन्ही संघ येथे दोन आघाडीच्या फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरु शकतात.


दोन्ही संघातील संभाव्य प्लेइंग इलेव्हन


मुंबई इंडियंस- क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, हार्दिक पांड्या, किरॉन (कप्तान), क्रुनाल पांड्या, जेम्स पैटिनसन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट और जसप्रीत बुमराह.


रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - देवदत्त पडिकल, आरोन फिंच, विराट कोहली (कप्तान), एबी डीविलियर्स (विकेटकीपर), गुरकीरत सिंह मान, क्रिस मॉरिस, वाशिंगटन सुंदर, इसुरु उदाना, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज और युजवेंद्र चहल.