IPL 2020, MI vs DC : आयपीएल 2020 चा पहिला प्लेऑफ सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात जिंकणारा संघ थेट फायनल्समध्ये प्रवेश करणार आहे. पराभूत होणाऱ्या संघाला मात्र आणखी एक संधी देण्यात येणार आहे. या सामन्यात पराभव होणारा संघ एलिमिनेटर सामन्यातील विजयी संघासोबत दुसरा क्वॉलिफायर सामना खेळणार आहे.


मुंबई इंडियन्स या सामन्यात आपल्या मेन टीमसोबत खेळू शकते. याचाच अर्थ असा की, या सामन्यात आपल्याला हार्दिक पांड्या, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह अॅक्शनमध्ये दिसू शकतात. या तिनही खेळाडूंना मुंबईने आपल्या लास्ट लीग सामन्यात रेस्ट दिली होती. तसेच दिल्ली कॅपिटल्सचा संघ या सामन्यातही अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी पाठवू शकते. अजिंक्य रहाणेचा अनुभव आजच्या सामन्यात संघासाठी फायदेशीर ठरू शकतो.





चार वेळा आयपीएलमध्ये विजयी ठरलेला मुंबईचा संघ पुन्हा एकदा अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे, तसेच विजयचा प्रबळ दावेदारही आहे. दिल्लीचा संघ आतापर्यंत एकदाही आयपीएलच्या अंतिम फेरीत खेळलेला नाही. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात खेळणारा संघ 13व्या सीझनमध्ये अंतिम फेरी गाठणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दोन्ही संघाचं या सीझनमधील प्रदर्शन अत्यंत उत्तम राहिलं आहे. सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे, हे दोन्ही संघ कोणत्याही एका खेळाडूवर अवलंबून नसून संपूर्ण संघ संतुलित आहे. हिच या दोन्ही संघांची ताकद आहे.





आजच्या सामन्यासाठी संभाव्य संघ :


मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, कीरन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, जेम्स पैटिंसन/नाथन कुल्टर नाइल, ट्रेंट
बोल्ट, राहुल चाहर और जसप्रीत बुमराह.


दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), मार्कस स्टोइनिस, डेनियल सॅम्स/शिमरन हेटमायर/कीमो पॉल, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कगीसो रबाडा और एनरिक नॉर्टजे.


महत्त्वाच्या बातम्या :