IPL 2020, KXIP vs MI Team Predicted Playing 11 : आयपीएल 2020 13 व्या सीजनमध्ये आज किंग्स इलेव्हन पंजाब (KXIP) आणि मुंबई इंडियन्स (MI) आमने सामने येणार आहे. किंग्स इलेव्हन पंजाबने या सीजनमध्ये आतापर्यंत 3 मॅच खेळल्या आहेत. ज्यात एक विजय आणि दोन सामन्याक पराभव स्वीकारावा लागला आहे. पंजाब 2 अंकांसह पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्सने देखील या सीजनमध्ये तीन पैकी एका मॅचमध्ये विजय मिळवला आहे. पॉइंट टेबलमध्ये मात्र मुंबई सहाव्या स्थानी आहे. किंग्स इलेव्हन पंजाबचं (KXIP) नेतृत्व केएल राहुलच्या खांद्यावर आहे. तर मुंबई इंडियन्सचा (MI) धुरा रोहित शर्मा सांभाळत आहे.


आयपीएल 2020 मध्ये मुंबई इंडियन्सला सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून हार पत्करावी लागली होती. पण कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध विजय मिळवून त्यांनी पुनरागमन केले. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये तिसर्‍या सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. पंजाब संघाला पुन्हा एकदा राहुल आणि मयांक अग्रवालकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. जर ही दोघांची जोडी चाचली तर ती मुंबईसाठी धोकादायक ठरू शकते.


IPL 2020 : KKR च्या विजयानंतर बदलली पॉइंट टेबलची समीकरणं; कोणता संघ, कोणत्या स्थानी?


मुंबई इंडियन्स संभावित प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, कीरोन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, जेम्स पैटिनसन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह


किंग्स इलेवन पंजाब संभावित प्लेइंग इेलव्हन : केएल राहुल (विकेटकिपर/कॅप्टन), मयांक अग्रवाल, निकोलस पूरन, जेम्स नीशम, सरफराज खान, मोहम्मद शमी, शेल्डन कॉटरेल, रवि बिश्नोई, क्रिस जॉर्डन, दीपक हुड्डा, मनदीप सिंह