MI vs PBKS, IPL 2022 : पुण्याच्या एमसीए मैदानावर पंजाबविरोधातील सामन्यात मुंबईच्या संघात फक्त एक बदल करण्यात आला. मुंबईने टायले मिल्सला संघात स्थान दिले. मुंबईने 8.25 कोटी रुपयांत खरेदी केलेल्या टीम डेविडला संघात स्थान दिले नाही. त्यामुळे नेटकरी चांगलेच भडकलेय. सोशल मीडियावर मुंबईच्या चाहत्यांनी राग व्यक्त केला आहे. पंजाबविरोधात मुंबई फक्त तीन विदेशी खेळाडूंसह मैदानात उतरला. मुंबईने पुन्हा टीम डेविडला संघात स्थान दिले नाही. त्यानंतर नेटकऱ्यांनी मुंबईला ट्रोल करण्यास सुरुवात केली. रोहित शर्मालाही ट्रोल केले आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगमाआधी झालेल्या लिलावात मुंबईने टीम डेविड याला 8.25 कोटी रुपयांत खरेदी केले होते. 


यंदा आयपीएलमध्ये दोन नवीन संघ सामील झाल्यामुळे मेगा लिलाव पार पडला. त्या लिलावाधी प्रत्येक संघाला काही खेळाडूंना रिटेन करण्याची संधी देण्यात आली होती. मुंबईने रोहित शर्मा, जसप्रीत बुमरहा, सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्ड यांना रिटेन केले होते. मुंबईला हार्दिक पांड्या, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट सारख्या दिग्गजांना सोडावं लागलं. हार्दिक पांड्या मुंबईसाठी ट्रम्प कार्ड होता. नव्या गुजरात संघाने लिलावाआधी हार्दिक पांड्याला आपल्या संघात सामील करुन घेतलं. त्यामुळे हार्दिकची जागा भरण्यासाठी मुंबईने टीम डेविडवर डाव खेळला. 






लिलावामध्ये 40 लाख रुपये बेस प्राइज असणाऱ्या टीम डेविडसाठी मुंबईने 8.25 कोटी रुपये मोजले. हार्दिक पांड्यासारखा धाकड अष्टपैलू खेळाडू मुंबईला हवा होता. त्यामुळेच मुंबईने लिलावात तब्बल 6.5 फुट उंचीचा युवा खेळाडू टीम डेविडला विकत घेतलं. पण मुंबईने टीम डेविडला संधी दिली नाही. त्यामुळे चाहत्यांना राग अनावर आला. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मुंबईच्या संघाला ट्रोल केले. 


पाहा नेटकरी काय म्हणाले?