Virat Kohli On MS Dhoni : महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहली यांच्यातील नातं जगजाहीर आहे. विराट कोहलीने अनेकदा धोनीची स्तुती आणि कौतुक केलं आहे. धोनीने त्याला दिलेला पाठिंबाही विराटने अनेकदा जगजाहीरपणे सांगितला. आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये बोलताना विराट कोहलीनं धोनीचं कौतुक केले आहे. त्याशिवाय धोनीसोबत असलेल्या बॉडिंगवरही बोलला आहे.


सध्या क्रिकेटमधील माझ्या करिअरचा वेगळा अनुभव घेतला आहे. त्याशिवाय कठीण काळात धोनीने केलेल्या मदतीबद्दलही विराट कोहलीनं मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. 


धोनी सर्वात मोठी ताकद -


विराट कोहलीने आरसीबी पॉडकास्टवर बोलताना सांगितलं की, अनुष्का शर्माशिवाय धोनीने मला माझ्या कठीण काळात सपोर्ट केला. धोनी माझी मोठी ताकद आहे. धोनीकडून मला खूप मोठा पाठिंबा मिळाला. कुटुंब, लहानपणीचा कोच यांच्याशिवाय फक्त धोनीने कठीण काळात मला मदत केली. खराब फॉर्म असताना धोनीने मानसिक आधार दिला, असे विराट कोहली म्हणाला. 


एमएस धोनीशी संपर्क करणं खूप कठीण आहे. कारण, जर धोनीला फोन केला तर 99 टक्के तो उचलणार नाही, याची शाश्वती आहे. कारण, धोनी जास्त फोन पाहत नाही. मी धोनीसोबत दोन वेळा फोनवर बोललो आहे, असे विराट कोहली म्हणाला.  करिअरमध्ये एक असा टप्पा असतो, त्यावेळी तुम्ही अशा व्यक्तीच्या संपर्कात राहू इच्छिता ज्याने तो अनुभवला आहे. एमएस धोनी अशा परिस्थितीतू गेला आहे, असे विराट कोहली म्हणाला.



 






कोहलीने धोनीसोबत 2008 पासून 2019 पर्यंत ड्रेसिंग रुम शेअर केली आहे. 11 वर्षात धोनीने प्रत्येकवेळा आपल्याला सपोर्ट केल्याचं विराट कोहलीनं सांगितलं. धोनीसारख्या दिग्गज खेळाडूसोबत ड्रेसिंग रुम शेअर करणं हे माझं सौभाग्य आणि नशीब आहे. कारण अनुभवी व्यक्तीकडून तुम्हाला नेहमीच शिकता येतं. आम्ही एकमेंकाना सन्मान देतो, असे विराट कोहली म्हणाला.


धोनीमुळे फॉर्म परतला - 


यावेळी बोलताना विराट कोहली म्हणाला की, धोनीमुळे माझा परत आला. दोन वेळा धोनीने मला मेसेजकरून सांगितलं की, तू दमदार पुनरागमन कधी करतोय. त्यामुळे मला आत्मविश्वास मिळाला.


आणखी वाचा :
कांगारुंना घरचा आहेर, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने पॅट कमिन्सला सुनावलं, म्हणाला....