India vs Australia : बॉर्डर गावस्कर मालिकेतील नागपूर आणि दिल्ली कसोटीतील मानहाणीकारक पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघावर चहूबाजूने टीका होत आहे. क्रीडा विश्वातून त्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यातच आता पॅट कमिन्सच्या नेतृत्वावरही सवाल उपस्थित होतोय. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू जेफ लॉसन यानं कर्णधार पॅट कमिन्स आणि कोच डॅनिअल विटोरी यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पराभवाला कर्णधार पॅट कमिन्स आणि सहायक कोच डॅनिअल विटोरी जबाबदार असल्याची टीका जेफ लॉसन यांनी केला आहे.
जेफ लॉसन यांनी 1980 च्या दशकात ऑस्ट्रेलियासाठी कसोटी आणि वनडे सामने खेळले आहेत. त्यांनी वेगवान गोलंदाजीची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. ते म्हणाले की, कमिन्सने देशांतर्गत क्रिकेट खूप कमी खेळले आहे. कमिन्सने शेफील्ड शील्ड क्रिकेट स्पर्धा खूप कमी खेळली आहे. त्यामुळे रणनिती फसली आहे.
लॉसन यांनी एसईएन रेडियोवर दिलेल्या मुलाखतीत ऑस्ट्रेलियाच्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेय. ते म्हणाले की, कमिन्सकडे फिरकी खेळपट्टीवर नेतृत्व करण्याचा खूप कमी अनुभव आहे. सध्याच्या घडीला कमिन्स खूप कमी शेफील्ड शील्ड स्पर्धा खेळतोय. त्यामुळेच त्याला फिरकी खेळपट्टीवर खेळण्याचा अनुभव कमी आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप काही शिकता येत... त्यामुळेच देशांतर्गत क्रिकेटकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. ऑस्ट्रेलियाच्या या मानहाणीकारक पराभावाला कमिन्स आणि विटोरी जबाबदार आहेत. डेनियल विटोरीने पॅट कमिन्सला चुकीचा सल्ला दिला. पहिल्या दोन कसोटी सामन्यात अश्विन आणि जाडेजा यांनी भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.
भारताच्या फिरकी जोडीसमोर ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाजांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. नागपूर आणि दिल्ली कसोटी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी लोटांगन घातल्याचं दिसलं. दिल्ली आणि नागपूर कसोटी अवघ्या तीन दिवसात संपली. यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघावर टीका होत आहे. त्यातच कर्णधार पॅट कमिन्स कौटंबिक कारणामुळे मायदेशी परतला आहे. त्यानंतर दुखापतीमुळे डेविड वॉर्नरही मालिकेतून बाहेर गेला. जोश हेजलवूड याच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह आहे. त्यातच भर म्हणून आता फिरकीपटू अॅशटन एगर याला टीम मॅनेजमेंटने मायदेशात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत क्रिकेटसाठी अगरला मायदेशात पाठवण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंटने घेतला आहे.
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली, त्यात डावखुरा फिरकी गोलंदाज मॅथ्यू कुहनेमन याचा समावेश करण्यात आला नव्हता. पण पहिल्या कसोटी सामन्यानंतर मिचेल स्वेप्सन मायदेशात परतला तेव्हा दुसऱ्या कसोटी सामन्यात अचानक कुहनेमन याला संधी देण्यात आली. बॉर्डर गावस्कर मालिकेत ऑस्ट्रेलियाची रणनिती अपयशी ठरली आहे. दिल्ली कसोटीमध्ये तर संपूर्ण ऑस्ट्रेलियाचा संघ स्विपच्या जाळ्यात अडकला. अश्विन-जाडेजाच्या फिरकीपुढे ऑस्ट्रेलियाच्या फंलदाजांनी नांगी टाकली होती. ऑस्ट्रेलियासाठी जमेची बाजू म्हणजे, मिचेल स्टार्क आणि खॅमरुन ग्रीन अखेरच्या दोन कसोटीसाठी फिट असल्याचं सांगण्यात आलेय.
आणखी वाचा :
कांगारुंचं नेमकं चाललंय तरी काय! कमिन्स, वॉर्नरनंतर आता आणखी एक खेळाडू ऑस्ट्रेलियाला गेला