India Squad For England Test : इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. शनिवारी (24 मे) मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी मुंबईत पत्रकार परिषदेद्वारे 18 सदस्यीय संघाची घोषणा केली. सर्वात मोठी बातमी म्हणजे शुभमन गिलला भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याच वेळी, स्टार यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत उपकर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारेल.

Continues below advertisement

अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीने पुन्हा एकदा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला दुर्लक्षित केले आहे. शमीच्या तंदुरुस्तीवर अजूनही प्रश्नचिन्ह आहेत आणि तो कसोटी सामन्यात एका दिवसात 20 षटके टाकू शकेल की नाही याबद्दल शंका आहे, असे वृत्त आहे. मोहम्मद शमीच्या जागी निवडकर्त्यांनी युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला संघात स्थान दिले आहे.

Continues below advertisement

सुदर्शन-अर्शदीपचे नशीब चमकले

आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या साई सुदर्शनला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी शुभमन गिलच्या जोडीदाराला टीम इंडियामध्ये एन्ट्री मिळाली आहे. डावखुरा फलंदाज असलेल्या या खेळाडूने आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत आणि 53.17 च्या सरासरीने 638 धावा केल्या आहेत. त्याच वेळी, पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचे नशीबही उजळले आहे आणि त्याला आता कसोटीत आपली ताकद दाखवण्याची संधी मिळाली आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात गुजरात टायटन्सचे वर्चस्व दिसत आहे. कारण टीम इंडियात आयपीएलमधील गुजरात टायटन्स संघाचे 5 खेळाडू आहे, तर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघातील केवळ एका-एका खेळाडूला संधी मिळाली आहे. पण नीट लक्ष दिल्यास रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्स या संघातील इंग्लंड दौऱ्यासाठीच्या एक पण खेळाडू नाही.

टीम इंडियात आयपीएलमधील कोणत्या संघाचे किती? 

गुजरात टायटन्स - शुभमन गिल, साई सुदर्शन, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा.

लखनौ सुपर जायंट्स - ऋषभ पंत , शार्दूल ठाकूर, आकाश दीप

दिल्ली कॅपिटल्स - करुण नायर, लोकेश राहुल, कुलदीप यादव

राजस्थान रॉयल्स - यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल

सनरायझर्स हैदराबाद - नितीश कुमार रेड्डी

पंजाब किंग्स- अर्शदीप सिंग

चेन्नई सुपर किंग्स - रवींद्र जडेजा

मुंबई इंडियन्स - जसप्रीत बुमराह

कोलकाता नाइट रायडर्स - एक पण खेळाडू नाही.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - एक पण खेळाडू नाही.