SRH vs LSG : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज पार पडणाऱ्या सामन्यात दोन दमदार संघ आमने-सामने असतील. यामध्ये नव्याने सामिल झालेल्या लखनौ सुपरजायंट्ससमोर सनरायजर्स हैदराबाद संघाचं आव्हान असणार आहे. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स हा सामना (LSG vs SRH) लखनौसाठी त्यांचा स्पर्धेतील दुसरा विजय मिळवण्यासाठी महत्त्वाचा असेल. त्यांनी आतापर्यंत एक विजय आणि एक पराभव मिळवला आहे. तर दुसरीकडे पराभवाने सुरुवात झालेल्या हैदराबादला आज पहिल्या विजयाची प्रतिक्षा असेल.


सामन्यापूर्वी नुकतीच नाणेफेक झाली असून सनरायजर्स हैदराबादने नाणफेक जिंकत गोलंदाजी निवडली आहे.आजच्या सामन्यात लखनौ संघाकडून दमदार खेळाडू जेसन होल्डर संघात सामिल होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक अव्वल दर्जाचा अष्टपैलू होल्डरच्या संघात येण्याने लखनौची ताकद आणखी वाढेल. होल्डर आत आल्याने दुश्मंत चमिराला संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे. तर नेमकी दोन्ही संघाची अंतिम 11 कशी आहे, यावर एक नजर फिरवूया...


हैदराबादचे अंतिम 11  


अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, केन विलियमसन (कर्णधार), निकोलस पूरन (विकेटकीपर), अॅडन मार्करम, अब्दुल समाद, वॉशिंग्टन सुंदर, रोमारियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उम्रान मलिक.


लखनौ अंतिम 11 


केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डि कॉक (विकेटकीपर), एविन लुईस, मनीष पांडे, दीपक हु़डा, आयुष बदोनी, क्रुणाल पंड्या, जेसन होल्डर, अँड्रयू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha