CSK vs PBKS: मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर रविवारी खेळल्या जात असलेल्या IPL 2022 च्या 11 व्या सामन्यात रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने पंजाब किंग्ज (PBKS) कर्णधार मयंक अग्रवाल विरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईला आपल्या दोन्ही सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. याच दरम्यान पंजाब संघ एका सामन्यात विजय आणि दुसऱ्यात पराभव पत्करून या सामन्यात पोहोचला आहे.
या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार मयंक अग्रवालने हरप्रीत ब्रार आणि राज बावा यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यांच्या जागी वैभव अरोरा आणि जितेश शर्मा यांना संधी मिळाली आहे. वैभव हा वेगवान गोलंदाज असून जितेश हा यष्टिरक्षक, फलंदाज आहे. त्याचवेळी चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजाने देखील संघात एक बदल केला आहे. वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेच्या जागी ख्रिस जॉर्डनचा अंतिम अकरामध्ये समावेश करण्यात आला आहे.
पंजाब किंग्ज प्लेइंग इलेव्हन: मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, भानुका राजपक्षे (डब्ल्यूके), लियाम लिव्हिंगस्टोन, शाहरुख खान, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, राहुल चहर आणि वैभव अरोरा.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन: ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी (विकेटकीपर), शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, ड्वेन प्रिटोरियस आणि मुकेश चौधरी.
संबंधित बातम्या:
CSK vs PBKS, IPL 2022 Live Score: पंजाबला दुसरा झटका, राजपक्षे 9 धावा करून बाद