RCB vs RR: आयपीएलमध्ये (IPL 2022) आज पार पडणाऱ्या रॉयल चँलेजर्स बंगळुरु विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) सामन्यापूर्वी नुकतीच नाणेफेक झाली असून रॉयल चँलेजर्स बंगळुरुने नाणफेक जिंकत गोलंदाजी निवडली आहे. राजस्थान संघाने आतापर्यंत हंगामात सर्वात दमदार कामगिरी केली असून सध्या ते पॉईंट टेबलमध्येही (Point Table) अव्वल स्थानावर आहेत. दुसरीकडे आरसीबी संघाने सुमार कामगिरी केली दोन पैकी एक सामना जिंकला असून एक सामन्यात ते पराभूत झाले आहेत.
वानखेडेची खेळपट्टी कायमच फलंदाजांसाठी लाभदायक ठरली असून छोट्या बाऊंड्रीस फलंदाजांसाठी अधिक फायदेशीर ठरतात. आजच्या सामन्यातही दव हा एक मोठा फॅक्टर ठरु शकतो. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ नक्कीच प्रथम गोलंदाजी घेणार हे निच्छित होते, त्यानुसार रॉयल चँलेजर्स बंगळुरुने प्रथम गोलंदाजी निवडली आहे. तर नेमकी दोन्ही संघाची अंतिम 11 (Final Playing 11) कशी आहे, यावर एक नजर फिरवूया...
बंगळुरुचे अंतिम 11
फाफ डु प्लेसीस(कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शेरफेन रुदरफोर्ड, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, डेविड विली, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
राजस्थान अंतिम 11
जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हिटमायर, रियान पराग, रवीचंद्रन आश्विन, नवदीप सैनी, ट्रेन्ट बोल्ट, युझवेंद्र चहल, प्रसिध कृष्णा.
हे देखील वाचा-
- Womens World Cup 2022 : आयसीसीने निवडली महिला विश्वचषकातील बेस्ट 11, एकाही भारतीय खेळाडूला संधी नाही
- IPL 2022 : ब्रँडन मॅक्युलमला 'या' विकेटकीपर फलंदाजात दिसते धोनीची झलक
- IPL 2022: हवेत उडी मारत लियाम लिव्हिंगस्टोनं पकडला ड्वेन ब्राव्होचा झेल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha