RCB vs PBKS, Pitch Report : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स (RCB vs PBKS) या दोन्ही संघात सामना पार पडणार आहे. यंदाच्या हंगामात बंगळुरुने आतापर्यंत 12 पैकी 7 सामने जिंकत 14 गुणांसह चौथं स्थान मिळवलं आहे. पण त्यांचा रनरेट काहीसा कमी आहे. दरम्यान आजचा विजय त्यांच्या खात्यात 16 गुण देईल आणि प्लेऑफच्या दिशेने त्यांचा एक यशस्वी पाऊल पडेल. दुसरीकडे पंजाब संघाने 11 पैकी 5 सामने जिंकल्याने ते गुणतालिकेत आठव्या स्थानी आहेत. त्याचं पुढील फेरीत पोहोचणं अवघड असलं तरी त्यांच्याकडे बंगळुरुपेक्षा अधिक सामने असल्याने त्यांची पुढील फेरीत पोहोचण्याची शक्यता जिवंत आहे. दरम्यान आतापर्यंतच्या सामन्यांत खेळाडूंच्या फॉर्मचा विचार करता कोणत्या 11 (Probable 11) खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष असेल ते पाहूया...


बंगळुरु विरुद्ध पंजाब अशी असेल ड्रीम 11 (RCB vs PBKS Best Dream 11)


विकेटकीपर- जॉनी बेअरस्टो, दिनेश कार्तिक


फलंदाज- फाफ डु प्लेसीस, विराट कोहली, भानुका राजपक्षा, शिखर धवन


ऑलराउंडर- लियाम लिव्हिंगस्टोन, ग्लेन मॅक्सवेल


गोलंदाज- कागिसो रबाडा, वानिंदू हसरंगा, जोश हेझलवुड 


कसा आहे पिच रिपोर्ट?


आजचा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानात पार पडणार आहे. आतापर्यंत या ठिकाणी पार पडणाऱ्या सामन्यांमध्ये फलंदाजाना अधिक मदत मिळाल्याने एक मोठी धावसंख्या आजही उभी राहू शकते. दरम्यान आज पार पडणारा सामना सायंकाळच्या सुमारास होणार असल्याने दुसऱ्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाची अडचण येऊ शकते, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा सामना प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल.


हे देखील वाचा-