PBKS vs SRH, Pitch Report : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज पार पडणाऱ्या सामन्यात पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद बंगळुरु (PBKS vs SRH) हे दोन्ही संघ मैदानात एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. विशेष म्हणजे दोन्ही संघ आतापर्यंत समान सामने खेळले असून समाने विजय आणि पराजय त्यांच्या नावावर आहेत. त्यामुळे आज जिंकणारा संघ एका अधिक गुणासह गुणतालिकेत वर झेप घेऊ शकतो. आजच्या सामन्यात कोणते खेळाडू चांगली कामगिरी करतील याकडे सर्वांचे लक्ष असून पण तरी आतापर्यंतच्या खेळाडूंच्या फॉर्मचा विचार करता कोणत्या 11 (Probable 11) खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष असेल ते पाहूया...


पंजाब विरुद्ध हैदराबाद अशी असेल ड्रीम 11 (PBKS vs SRH Best Dream 11)


विकेटकीपर- निकोलस पूरन


फलंदाज- मयांक अगरवाल, शिखर धवन, एडन मार्करम, राहुल त्रिपाठी, केन विल्यमसन 


ऑलराउंडर- लियाम लिव्हिंगस्टोन, ओडियन स्मिथ


गोलंदाज- भुवनेश्वर कुमार, राहुल चाहर, टी नटराजन 


कसा आहे पिच रिपोर्ट?


आजचा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आजचा सामना दुपारच्या वेळेत होणार आहे, त्यामुळे उष्णता अधिक असल्याने दवाची अडचण अधिक होणार नाही. दवाची अडचण नसल्याने नाणेफेक आजच्या सामन्यात मोठा प्रभाव पाडणार नसल्याचं ही तज्ज्ञांचं मत आहे.


हे देखील वाचा-