MI vs LSG, Pitch Report : आयपीएलमध्ये (IPL 2022) सर्वाधिक वेळा ट्रॉफी उचललेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला यंदा एकही विजय मिळवता आलेला नाही. मुंबईने सलग पाच सामन्यात पराभव मिळवला असून आज त्यांची सहावी लढत आहे. मुंबईकरांसमोर आज लखनौचे आव्हान आहे. त्यांनी पाच पैकी तीन जिंकले असून दोन सामने केवळ गमावले त्यांचा फॉर्म मुंबईपेक्षातरी चांगला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणाची सरशी होईल हे पाहावं लागेल.


प्रत्येक सामन्यात मुंबईच्या संघात बदल झाल्याचं पाहायला मिळालं.मुंबईच्या फलंदाजीची भिस्त पुन्हा कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्यावर असेल. त्यांना युवा डेवॉल्ड ब्रेविस आणि तिलक वर्मा यांची साथ लाभेल. गोलंदाजीत जसप्रीत बुमरा चांगली कामगिरी करत आहे. मात्र, इतर गोलंदाज अपयशी ठरले आहेत. यामुळं आजच्या सामन्यात मुंबईचा संघ कोणत्या खेळाडूला संधी देईल हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.


कसा आहे पिच रिपोर्ट?


आजचा सामना मुंबईतील सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम खेळवला जाणार आहे. सामना मुंबईत त्यात दुपारच्या सुमारास असल्याने हवामान उष्ण असणार आहे. त्यामुळे दवाची अडचण अधिक येणार नाही, अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दवामुळे आजच्या सामन्याचा विजेता ठरला जाणार नसून दमदार खेळी करणारा संघच आज विजय मिळवेल. 


मुंबई विरुद्ध लखनौ अशी असेल ड्रीम 11 (MI vs RCB Best Dream 11)


विकेटकीपर- लोकेश राहुल, ईशान किशन


फलंदाज- रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा


ऑलराउंडर- केरॉन पोलार्ड, डिवॉल्ड ब्रियूस, कृणाल पंड्या


गोलंदाज- आवेश खान, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह


हे देखील वाचा-