MI vs KKR :आयपीएलमध्ये (IPL 2022) आज पार पडणाऱ्या 14 व्या आयपीएल सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने नुकतीच नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष चँलेजर्स बंगळुरु विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) सामन्यापूर्वी नुकतीच नाणेफेक झाली असून रॉयल चँलेजर्स बंगळुरुने नाणफेक जिंकत गोलंदाजी निवडली आहे. विशेष म्हणजे आज सामना पार पडणाऱ्या पुण्याच्या एमसीए मैदानात आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे, तरीदेखील केकेआरने प्रथम गोलंदाजी घेतल्याने नेमकी त्यांची रणनीती कशी आहे हे पाहावे लागेल. 



शिवाय आज केकेआरमध्ये त्याचा हुकूमी एक्का पॅट कमिन्स संघात पुन्हा परतला आहे. टीम साऊदीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे संघाची गोलंदाजी आणखी चोख होणार यात शंका नाही. दुसरीकडे मुंबईच्या संघातही दोन मोठे बदल झाले आहेत. सूर्यकुमार यादव अनमोलप्रित सिंगच्या जागी आला असून बेबी एबी म्हणून प्रसिद्ध डी. ब्रेविस टीम डेव्हिडच्या जागी संघात आला आहे. 


मुंबई अंतिम 11  


रोहित शर्मा (कर्णधार) ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, डी. ब्रेव्हिस, डॅनियल सॅम्स, मुरुगन आश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी. 


कोलकाता अंतिम 11 


अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), आंद्रे रसेल, सुनील नारायण, पॅट कमिन्स, रसिख सलाम, उमेश यादव, वरुण चक्रवर्थी 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha