KKR vs MI : आज पुण्याच्या मैदानात पार पडणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा एक मोठा विक्रम करु शकतो. तो तब्बल 10000 टी20 धावा करण्यापासून केवळ 54 धावा दूर असून आज त्याने 54 धावा केल्यास तो 10000 टी20 धावा पूर्ण करेल. विशेष म्हणजे ही कामगिरी करणारा रोहित दुसराच भारतीय ठरु शकतो. 


विश्व क्रिकेटमध्ये ही कामगिरी केवळ 6 खेळाडूंनी केली आहे. ज्यामध्ये सध्या विराट कोहली हा एकमेव भारतीय आहे. विराटनंतर आता रोहितही या लिस्टमध्ये आज सामिल होऊ शकतो. रोहितने आजवर 372 सामन्यात 9 हजार 946 रन केले आहेत. यादरम्यान रोहितने 69 अर्धशतकं झळकावली असून रोहितने 6 शतकंही झळकावली आहेत. मुंबईची यंदाच्या हंगामाची सुरुवात खास झाली नसली तरी त्यांच्याकडे आजचा सामना जिंकल्यास ते स्पर्धेत यशस्वी पुनरागमन करु शकतील. त्यांनी आतापर्यंत 2 पैकी 2 सामने गमावले असून आज त्यांचा तिसरा सामना आहे.


हे आहेत टॉप 5


संपूर्ण यादी पाहता टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये ख्रिस गेल पहिल्या स्थानावर आहे. गेलने 14 हजार 562 रन केले आहेत. त्याच्यानंतर शोएब मलिक 11 हजार 698 रन करत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांच्यानंतर पोलार्ड 11 हजार 452 धावांसह तिसऱ्या, आरॉन फिंच 10 हजार 499 धावांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यानंतर कोहली 10331 धावा करत पाचव्या स्थानावर असून त्याने 76 अर्धशतकंही झळकावली आहेत. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha