LSG vs RR, Pitch Report : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज लखनौ सुपरजायंट्स आणि राजस्थान रॉयल्स (LSG vs RR) हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. लखनौची स्पर्धेतील कामगिरी पाहता त्यांचं पुढील फेरीचं तिकीट जवळपास निश्चित झालं आहे. तर राजस्थानसाठी आज विजय स्पर्धेतील आव्हान जिंवत ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. गुणतालिकेचा विचार करता लखनौने 12 सामन्यात आठ विजय मिळवले आहेत. राजस्थानचा संघानेही प्रभावी कामगिरी केली आहे. राजस्थान संघाने 12 सामन्यात सात विजय मिळवलेत. पण तरी दोन्ही संघांना आजचा विजय महत्त्वाचा असल्याने आज एक चुरशीचा सामना पाहायला क्रिकेटप्रेमींना मिळू शकतो. 


लखनौसाठी कर्णधार केएल राहुल आणि क्विंटन डिकॉक यांनी धाडक फलंदाजी केली आहे. त्याशिवाय दीपक हुड्डा आणि युवा आयुष बडोनी यांनी ताबडतोड फलंदाजी केली आहे. दुसरीकडे राजस्थानसाठी  जोस बटलरने धावांचा पाऊस पाडलाय. तीन शतकासह यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा बटलरच्या नावावर आहेत. तर गोलंदाजीत अश्विन आणि चहल कमाल करत आहे. त्याशिवाय प्रसिद्ध कृष्णा आणि बोल्टही भेदक मारा करत आहे. लखनौसाठी आवेश खान आणि मोहसीन खान यांनी भेदक मारा केलाय. जेसन होल्डर आणि मार्कस स्टॉयनिस यांचा फॉर्म लखनौसाठी चिंतेचा विषय आहे. 


लखनौ विरुद्ध राजस्थान अशी असेल ड्रीम 11 (PBKS vs RR Best Dream 11)


विकेटकीपर-  संजू सॅमसन, जोस बटलर, केएल राहुल


फलंदाज- देवदत्त पडिक्कल, दीपक हुडा


ऑलराउंडर - मार्कस स्टॉयनिस, रवीचंद्रन आश्विन, कृणाल पांड्या


गोलंदाज- मोहसीन खान, आवेश खान, युझवेंद्र चहल.  


कसा आहे पिच रिपोर्ट?


आजचा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानात पार पडणार आहे. आतापर्यंत या ठिकाणी पार पडणाऱ्या सामन्यांमध्ये फलंदाजाना अधिक मदत मिळाल्याने एक मोठी धावसंख्या आजही उभी राहू शकते. दरम्यान आज पार पडणारा हा सामना सायंकाळच्या सुमारास होणार असल्याने दुसऱ्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाची अडचण येऊ शकते, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा सामना प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल. 


महत्त्वाच्या इतर बातम्या