IPL 2022, LSG vs RR : राहुलच्या नेतृत्वातील लखनौ सुपर जायंट्स आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स रविवारी ब्रेबॉनच्या स्टेडिअमवर एकमेंकासमोर असतील. दोन्ही संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. लखनौचा संघ प्लेऑफचे तिकीट पक्कं करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. दोन्ही संघामध्ये चुरशीची लढाई होण्याची शक्यता आहे.
लखनौने 12 सामन्यात आठ विजय मिळवले आहेत. राजस्थानचा संघानेही प्रभावी कामगिरी केली आहे. राजस्थान संघाने 12 सामन्यात सात विजय मिळवलेत. लखनौसाठी कर्णधार केएल राहुल आणि क्विंटन डिकॉक यांनी धाडक फलंदाजी केली आहे. त्याशिवाय दीपक हुड्डा आणि युवा आयुष बडोनी यांनी ताबडतोड फलंदाजी केली आहे. दुसरीकडे राजस्थानसाठी जोस बटलरने धावांचा पाऊस पाडलाय. तीन शतकासह यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा बटलरच्या नावावर आहेत. तर गोलंदाजीत अश्विन आणि चहल कमाल करत आहे. त्याशिवाय प्रसिद्ध कृष्णा आणि बोल्टही भेदक मारा करत आहे. लखनौसाठी आवेश खान आणि मोहसीन खान यांनी भेदक मारा केलाय. जेसन होल्डर आणि मार्कस स्टॉयनिस यांचा फॉर्म लखनौसाठी चिंतेचा विषय आहे.
दोन्ही संघाची संभावित प्लेईंग 11 कशी असेल -
Lucknow Super Giants -
केएल राहुल (कप्तान), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉयनिस, दीपक हूडा, क्रुणाल पांड्या, आयुष बदोनी, जेसन होल्डर, आवेश खान, रवि बिश्नोई, दुश्मांथा चमीरा, मोहसीन खान
Rajasthan Royals -
संजू सॅमसन (कप्तान), जोस बटलर, यशस्वी जायसवाल, देवदत्त पडीक्कल, रसी वॅन डर डुसेन, रियान पराग, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप सेन
खेळपट्टी आणि पिच रिपोर्ट -
ब्रेबोर्न स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक आहे. अशात गोलंदाजांना मेहनत घ्यावी लागणार आहे. या मैदानावर नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार आहे. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होऊ शकतो. दव ही येथे महत्वाची भूमिका बजावू शकतो.
कधी आहे सामना?
आज 15 मे रोजी होणारा लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी सात वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. सात वाजता नाणेफेक होईल. नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार आहे.
कुठे आहे सामना?
हा सामना मुंबईतील ब्रेबॉन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज आणि बातम्या पाहाता येईल.