KKR vs DC : आयपीएलमधील 2022 (IPL 2022) आजच्या 19 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी (KKR vs DC) होणार आहे. सामन्यात केकेआरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिल्लीचे खेळाडू प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. स्पर्धेतील आजचा हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न मैदानात खेळवला जात आहे. याआधी दुपारच्या सत्रात याठिकाणी झालेला सामना दिल्लीने जिंकला होता, तर केकेआर सध्या गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. त्यामुळे आजचा सामना चुरशीचा होणार हे नक्की.



केकेआरने आयपीएलमध्ये आतापर्यंत 4 पैकी 3 सामने जिंकले असून दिल्लीने 3 पैकी 2 सामने गमावले आहेत. तर एकमेव सामना जिंकला आहे. आजच्या सामन्यात दिल्लीने एक मोठा बदल केला आहे. त्यानी नॉर्खियाला विश्रांती देत खलीलला संधी दिली आहे. तर नेमकी अंतिम 11 खेळाडू कोण आहेत ते पाहूया...


कोलकाता अंतिम 11


अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नारायण, पॅट कमिन्स, उमेश यादव, रसिख सलाम, वरुण चक्रवर्ती.


दिल्ली अंतिम 11 


ऋषभ पंत (कर्णधार,विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, सरफराज खान, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिझूर रेहमान, खलील अहमद


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha