DC vs RCB : यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2022) 27 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु(DC vs RCB)हे दोन्ही संघ आमने-सामने असणार असणार आहेत.  आजचा सामना मुंबईतील प्रसिद्ध अशा वानखेडे स्टेडियम खेळवला जाणार आहे. यंदा या मैदानात झालेल्या पाच पैकी चार सामन्यात चेस करणारा संघ जिंकला आहे. त्यामुळे आजही नाणेफेक जिंकणारा संघ नक्कीच प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेऊ शकते. त्यात सामना सायंकाळी असल्याने दवाची अडचण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आजचा सामना चुरशीचा होणार हे नक्की.

दिल्ली विरुद्ध बंगळुरु Head to Head

आयपीएलमध्ये आजवर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु हे संघ तब्बल 26 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता बंगळुरुचं पारडं जड राहिलं आहे. त्यांनी 15 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे दिल्ली संघाला 10 सामने जिंकण्यात यश आलं आहे. तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे. 

आजच्या सामन्यात अशी असू शकते संभाव्य अंतिम 11  

दिल्ली - ऋषभ पंत (कर्णधार,विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, सरफराज खान, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिझूर रेहमान, खलील अहमद

बंगळुरु - अनुज रावत, फाफ डु प्लेसीस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, जोस हेझलवुड, सुयश प्रभुदेसाई, आकाश दीप, मोहम्मद सिराज

 हे देखील वाचा-