Hardik Pandya & Rohit Sharma : अखेर मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएलमधील पहिला विजय (MI vs DC) मिळवलाच. लागोपाठ तीन पराभवानंतर मुंबई इंडियन्सने (Mumbai indians) दिल्लीचा पराभव करत पहिला विजय नोंदवला. या विजयात रोहित शर्माच्या नेतृत्वाचाही मोठा वाटा आहे. रोहित शर्माने वानखेडे मैदानावर हार्दिक पांड्याला महत्वाच्या टिप्स दिल्या. त्याशिवाय फिल्डिंग लावताना, गोलंदाजाची निवड करताना हार्दिक पांड्याला रोहित शर्माने महत्वाच्या टिप्स दिल्या. रोहित शर्माने बॅटने तर कमाल केलीच, त्याशिवाय मैदानात हार्दिकला महत्वाच्या टिप्स दिल्या. रोहित शर्माचा रविवारी वानखेडेवरील वावर पाहून चाहत्यांना मुंबई इंडियन्सचे दोन कर्णधार आहेत, का असाच प्रश्न पडला. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. 


आयपीएल 2024 च्या सुरुवातीच्या सामन्यापासूनच हार्दिक पांड्याला टीकेचा सामना करावा लागला होता. रोहित शर्माकडून कर्णधारपद काढल्यामुळे अनेक चाहत्यांनी त्याच्यावर राग व्यक्त केला. त्यात भर म्हणून हार्दिक पांड्याचं नेतृत्व खूपच साधारण दिसत होतं, त्याचा फटकाही मुंबई इंडियन्सला बसला. पण रविवारी वानखेडेवर वेगळेच चित्र दिसलं. रोहित शर्माने सामन्याआधी आणि सामन्यावेळीही हार्दिक पांड्याला महत्वाच्या टिप्स दिल्याचं समजतेय. दिल्लीविरोधात गोलंदाजाची निवड असो अथवा फिल्डिंगमधील बदल.. रोहित शर्माने सल्ला दिला.


2 कर्णधारांनी मुंबईला विजय मिळवून दिला - 


रोहित शर्मा मुंबईचा कर्णधार नाही, पण तरीही वानखेडे मैदानावर दिल्लीविरोधात त्यानं हार्दिक पांड्याला केलेली मदत कौतुकास्पद असल्याचं नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर सांगितलं. मुंबई इंडियन्सच्या विजयात रोहित शर्माच्या अनुभवाचा मोठा वाटा राहिलाय. रोहित शर्माने हार्दिक पांड्याला सामन्यादरम्यान वेळोवेळी महत्वाच्या टिप्स दिल्या. याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. दोन कर्णधारांनी मिळून मुंबईला यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवून दिला, अशी मिश्लिक टिप्पणीही काही चाहत्याकडून केली जात आहे. दरम्यान, आयपीएल 2024 आधी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केले. मुंबईच्या या निर्णायावर अनेकांनी टीका केली. हार्दिक पांड्यालाही ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मुंबईने सलग तीन सामने गमावल्यानंतर रोहित शर्मा पुन्हा मुंबईचा कर्णधार होणार, अशा चर्चाही सुरु झाल्या. काही माजी खेळाडूंनी भविष्यात रोहित शर्मा पुन्हा मुंबईची सुत्रे हातात घेऊ शकतो, अशी वक्तव्ये केली होती. तर वेगवान गोलंदाज एस श्रीसंत याच्या मते रोहित शर्मा आता पडद्यामागून मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करेल, असं म्हटलं होतं. 






मुंबईचा पहिला विजय -
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबईने अखेर आयपीएल 2024 मध्ये पहिल्या विजयाची नोंद केली. सलग तीन पराभवानंतर मुंबईने आपला पहिला विजय नोंदवला. मुंबईने दिल्लीचा 29 धावांनी पराभव केला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 234 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरदाखल दिल्लीच्या संघाला 205 धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबईने पहिला विजय मिळवताच गुणतालिकेतही मोठा फेरबदल झाला आहे. मुंबई संघाने दहाव्या क्रमांकावरुन आठव्या स्थानावर झेप घेतली आहे. मुंबईचे चार सामन्यात दोन गुण झाले आहेत.