IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघानं निराशाजनक कामगिरी केली आहे. यंदाच्या हंगामात मुंबईच्या संघाला एकही सामना जिंकता आला नाही. मुंबईला सलग आठ सामन्यात पराभव स्वीकारला लागलाय. आयपीएलच्या गुणतालिकेत मुंबईचा संघ तळाशी आहे. मुंबईचा सलामीवीर ईशान किशनसाठीही (Ishan Kishan) यंदाचा हंगामा चांगला ठरला नाही. या हंगामातील त्याचे दोन अर्धशतक सोडले तर, इतर सहा सामन्यात त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.


आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबईच्या संघानं ईशान किशनवर बोली लावली. मुंबईच्या संघानं त्याला 15 कोटीत विकत घेऊन संघात सामील केलं. आयपीएल 2022 मध्ये ईशान किशन सर्वात महाग खेळाडू ठरला. परंतु, यंदाच्या हंगामात त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानं आठ सामन्यात 28.43 च्या सरासरीनं 199 धावा केल्या आहेत. 


आयपीएलच्या सुरुवातीच्या दोन सामन्यात ईशान किशननं चांगली फलंदाजी केली. पहिल्या सामन्यात त्यानं नाबाद 81 केली. तर, दुसऱ्या सामन्यात त्यानं 54 धावांची खेळी केली. मात्र, गेल्या सहा सामन्यात त्यानं निराशाजनक कामगिरी केली. त्यानं मागील सहा सामन्यात 14, 26, 3, 13, 0, आणि 8 धावा केल्या आहेत.  त्यानं या हंगामात आतापर्यंत 199 धावा केल्या आहेत. यामुळं त्याच्या एका धावाची सरासरी 7.53 लाख इतकी होत आहे.


ईशान किशननं गुजरात लायन्सच्या संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं.त्यानंतर 2018 मध्ये मुंबईच्या संघानं त्यला 6.2 कोटीत विकत घेऊन संघात सामील केलं होतं. आयपीएलचा तेराव्या हंगामात ईशान किशननं जबरदस्त कामगिरी केली होती. त्यानं 14 सामन्यात 516 धावा केल्या होत्या. या हंगामात तो मुंबईच्या संघाकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. 


हे देखील वाचा-