Social Media On Hardik Pandya : आयपीएल 2024 च्या लिलावाआधीच मुंबई इंडियन्सने आपल्या चाहत्यांना धक्का दिलाय. मुंबईने आज हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केले. पाच वेळच्या आयपीएल विजेत्या रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेतले. हार्दिक पांड्याला कर्णधारपद दिल्याची माहिती सोशल मीडियावर दिली. हार्दिक पांड्याला मुंबईने कर्णधारपद देताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडलाय. कुणी या निर्णयाचं स्वागत केलेय, तर काहींनी टीका केली आहे. काहींच्या मते, धोनी अद्याप चेन्नईचा कर्णधार आहे, मग रोहित शर्माला का कर्णधार ठेवले नाही. काही चांहत्याचा प्रचंड रोष दिसून आलाय. तर काहींनी मुंबईच्या या निर्णयाचं स्वागत केलेय. 


सोशल मीडियावर चाहत्यांनी काय म्हटलेय... ?


हार्दिक पांड्या मुंबईच्या ताफ्यात पुन्हा सामील झाल्यानंतर कर्णधार होईल, अशी अटकळ बांधली जात होती. अखेर आज यावर शिक्कामोर्तब झालं. मुंबईने हार्दिकला कर्णधारपदाची माळ घातली. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. #HardikPandya #RohitSharma𓃵 #MumbaiIndians हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. हार्दिकला कर्णधार केल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 
 






















हार्दिककडे कर्णधारपद - 


मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्याने 2015 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. मुंबईने दिलेल्या संधीचे हार्दिक पांड्याने सोने केले. गोलंदाजी आणि फलंदाजीत त्याने शानदार कामगिरी केली. आयपीएलमधील शानदार कामगिरीच्या जोरावर हार्दिक पांड्याला टीम इंडियातही संधी मिळाली. त्याने ही संधी दोन्ही हातानी घेतली. मागील काही महिन्यापासून हार्दिक पांड्या टीम इंडियाचा महत्वाचा खेळाडू आहे. त्याच्याकडे भारतीय टी 20 संघाची धुराही दिली जातेय.


रोहित शर्मा मागील आयपीएलपासून एकही टी 20 सामना खेळला नाही. गतवर्षी रोहित शर्माच्या नेतृ्त्वात मुंबईला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळेच मुंबईने भविष्याचा विचार करत हार्दिक पांड्याकडे संघाची धुरा दिल्याचे बोलले जाते. मुंबईच्या या निर्णायावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर काही जणांनी कौतुक केलेय.  मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा याने आयपीएलमध्ये न खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे मुंबईने हा निर्णय घेतलाय.