Virat Kohli, Naveen ul Haq, Gautam Gambhir, LSG vs CSK : इंडियन प्रीमियर लीगमध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वादाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात भरमैदानात वाद झाला. या वादाला तीन दिवस उलटून गेले आहेत पण, ही घटना अजूनही अनेकांच्या मनात ताजी आहे. यावर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. काही चाहते गौतम गंभीरला साथ देताना तर काही चाहते विराट कोहलीला साथ देताना दिसत आहेत. चेन्नई विरुद्ध लखनौ सामन्यादरम्यानही अशीच एक घटना समोर आली आहे. चेन्नईच्या सामन्यादरम्यान, चाहते गंभीरसमोर कोहलीच्या नावाने घोषणाबाजी करत होते.


विराट कोहली आणि गंभीर यांच्यात वाद


लखनौ आणि बंगळुरु यांच्यातील सामन्या दरम्यान, कोहली आणि गंभीर या दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यानंतर बीसीसीआयने दोघांना मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावला. 1 मे रोजी बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) लखनौचा (Lucknow Super Giants)  त्यांच्याच घरच्या मैदानावर 18 धावांनी पराभव केला. सामन्यादरम्यान विराट कोहली आणि नवीन हक यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. तर सामना संपल्यानंतर गंभीर आणि कोहली यांच्यात भांडण झालं.


विराटच्या चाहत्यांनी गंभीरला केलं ट्रोल


या घटनेनंतर आता आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लखनौ आणि चेन्नई यांच्यातील सामन्यादरम्यानचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यावेळी विराटच्या चाहते गंभीरला ट्रोल करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. चेन्नईसोबतचा सामना रद्द झाल्यानंतर गंभीर जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये जात होता तेव्हा सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांनी 'कोहली-कोहली' नावाने घोषणा देण्यास सुरुवात केली. यानंतर गंभीरने दिलेली रिॲक्शनही व्हायरल होत आहे.


पाहा व्हायरल व्हिडीओ : नक्की काय घडलं? 






गंभीरची रिॲक्शन व्हायरल


चेन्नई विरुद्ध लखनौ सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे लखनौचा सल्लागार गौतम गंभीर ड्रेसिंग रुममध्ये परतत होता. यावेळी गंभीरला पाहून स्टेडिअममधील प्रेक्षकांनी कोहलीच्या नावाने घोषणा देण्यास सुरुवात केली. हे ऐकल्यावर गंभीर तिथेच थांबला आणि प्रेक्षकांकडे रागाने एक टक लावून पाहात होता. त्यानंतर काही वेळाने तो ड्रेसिंग रुममध्ये परतला. दरम्यान, लखनौ आणि चेन्नईचा सामना (LSG vs CSK) पावसामुळे अनिर्णित राहिला.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL History : कोहली अन् गंभीर आधी 'हे' खेळाडूही भिडले होते, एकानं तर भरमैदानातच कानशिलात लगावली