Ravi Shastri On Rishabh Pant : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला यंदा आपल्या कामगिरीत सातत्य राखता आले नाही. खराब कामगिरीमुळे ऋषभ पंत ट्रोल झालाय. ऋषभ पंतला भारताचे माजी कोच रवी शास्त्री यांनी मोलाचा सल्ला दिलाय... कोणताही विचार न करता आंद्रे रसेलप्रमाणे पंतने फलंदाजी करायला हवी, असा सल्ला रवी शास्त्री यांनी पंतला दिलाय. 


ऋषभ पंतला आतापर्यंत लौकिकास साजेशी खेळी करता आलेली नाही. पंतला कोणताही विचार न करता आंद्रे रसेल मोडमध्ये खेळण्याचा सल्ला रवी शास्त्री यांनी दिलाय. ईएसपीएन क्रिकइंफोसोबत रवी शास्त्री बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, " ऋषभ पंत फॉर्ममध्ये परतल्यानंतर त्याला रोखणं कठीण होईल, असे मला वाटतेय. टी 20 मध्ये पंतने आंद्रे रसेल मोडमध्ये फलंदाजी करायला हवी. जर पंतला एखाद्या गोलंदाजाविरोधात फटकेबाजी करायची असल्यास कोणताही विचार न करता फलंदाजी करावी... कारण तो लोकांच्या आपेक्षापेक्षा जास्त मॅचविनर खेळाडू आहे. " आंद्रे रसेल मानसिकरित्या मजबूत आहे, त्यामुळे टी 20 मध्ये तो फटकेबाजी करु शकतो. पंतनेही रसेलप्रमाणेच फलंदाजी करावी, असेही रवी शास्त्री म्हणाले. 


सेट झाल्यानंतर बाद होतोय पंत - 
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या तुलनेत यंदा अधिक धावा केल्या आहेत. पण ऋषभ पंत सेट झाल्यानंतर मोक्याच्या क्षणी विकेट टाकत आहे. दिल्लीच्या संघाला याचा सर्वाधिक फटका बसलाय. पंतला यंदाच्या हंगामात अद्याप एकही मोठी खेळी करता आलेली नाही. पंतच्या बॅटमधून अर्धशतकही निघाले नाही. पंतची सर्वोच्च धावसंख्या 44 आहे. आतापर्यंत पंतने 11 सामन्यात 31.22 च्या सरासरीने आणि 152 च्या स्ट्राईक रेटने 281 धावा केल्या आहेत.  यंदाच्या हंगामात पंतने 12 षटकार आणि 31 चौकार लगावले आहेत. 2021 मध्ये पंतने 419 आणि 2020 मध्ये 343 धावा केल्या होत्या.  यंदाच्या हंगामात ऋषभ पंत 150 पेक्षा जास्त स्ट्राईकरेटने धावा चोपत आहे, पण संघाला सामना जिंकून देण्यात अपयश येतेय.