GT vs LSG Match Preview : आयपीएल 2023 च्या (IPL 2023) आज पांड्या ब्रदर्स एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. रविवारी गुजरात (Gujrat Titans) आणि लखनौ (Lucknow Super Giants) या दोन संघांमध्ये लढत होणार आहे. 16 व्या हंगामातील 51 वा सामना गुजरात घरच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे.  गुजरात टायटन्सचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे असून कृणाल पांड्या लखनौ सुपर जायंट्सची कमान सांभाळणार आहे. आहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) दुपारी 3.30 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. यंदाच्या मोसमातील 30 व्या सामन्यात (IPL 2023 Match 30) गुजरातने लखनौचा पराभव केला होता. लखनौ संघ आज पराभवाचा वचपा काढण्यासाठी मैदानात उतरणार आहे.


GT vs LSG IPL 2023 : लखनौ की गुजरात कोण ठरणार वरचढ?


आयपीएल गुणतालिकेत गुजरात (GT) आणि लखनौ दोन्ही संघ टॉप 4 मध्ये आहेत. गुजरात टायटन्स संघ पहिल्या स्थानावर कायम आहे. तर, लखनौ सुपर जायंट्स संघ तिसऱ्या स्थानावर आहे. गतविजेता गुजरात संघ यंदाच्या मोसमातही दमदार कामगिरी करताना दिसत आहे. गुजरात संघाने आतापर्यंतच्या दहा पैकी सात सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दुसरीकडे लखनौ संघाने आतापर्यंत दहापैकी पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.


GT vs LSG Head To Head : हेड टू हेड आकडेवारी


इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये लखनौ (LSG) आणि गुजरात (GT) या संघांमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये गुजरात संघाचं पारड जड दिसून आलं आहे. गुजरात टायटन्स संघाने तिन्ही सामने जिंकले आहेत, पण लखनौला एकही सामना जिंकता आलेला नाही. आजच्या सामन्यात लखनौ नवा इतिहास रचणार की गुजरात पुन्हा बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


GT vs LSG IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?


लखनौ (LSG) आणि गुजरात (GT) यांच्यात आज 7 मे रोजी सामना रंगणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर दुपारी 3.30 वाजता रंगणार आहे. दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


राहुलची रिप्लेसमेंट लखनौला मिळाली, कसोटीत 300 धावांची खेळी करणाऱ्याला घेतले ताफ्यात