GT vs LSG , IPL 2023 : वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल यांच्या वादळी फटकेबाजीच्या जोरावर गुजरातने निर्धारित 20 षटकात दोन विकेटच्या मोबदल्यात २२७ धावांपर्यंत मजल मारली. गिल आणि साहा यांनी १४२ धावांची सलामी दिली. गुजरातकडूनची ही आतापर्यंतची सर्वात मोठी भागिदारी होय. लखनौला विजयासाठी 228 धावांचे आव्हान आहे.

Continues below advertisement



वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल या जोडीने गुजरातला वादळी सुरुवात करुन दिली. खासकरुन साहा ने लखनौच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. साहाने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फलंदाजी केली. शुभमन गिल याने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली.. साहा फटकेबाजी करत असताना गिलने चांगली साथ दिली. साहा आणि गिल जोडीने १२ षटकात १४२ धावांची सलामी दिली. साहाने मौदानाच्या चारी बाजूने फटकेबाजी केली. साहा याने अवघ्या २० चेंडूत अर्धशतक झळकावले होते. गुजरातने पावरप्लेमध्ये ७८ धावांचा पाऊस पाडला होता. साहाने ४३ चेंडूत वादळी ८१ धावांची खेळी केली. या खेळीत साहाने चार षटकार आणि दहा चौकार लगावले. साहा आणि गिल यांनी लखनौच्य प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. 


साहा बाद झाल्यानंतर शुभमन गिल याने सामन्याची सुत्रे आपल्या हातात घेतली. शुभमन गिल याने मैदानाच्या चारी बाजूने फटकेबाजी केली. चौकारांपेक्षा षटकार जास्त लावत गिल याने धावांचा पाऊस पाडला. शुभमन गिल याला कर्णधार हार्दिक पांड्याने चांगली साथ दिली. पांड्याने १५ चेंडूत दोन षटकार आणि एका चौकारासह २५ धावांची खेळी केली. शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या यांनी दूसऱ्या विकेटसाठी २३ चेंडूत ४२ धावा चोपल्या. हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर शुभमन गिल याने मिलरच्या साथीने गुजरातच्या डावाला आकार दिला. शुभमन गिल याने ५१ चेंडूत नाबाद ९४ धावांची खेळी केली. या खेळीत गिल याने सात षटकार आणि दोन चौकार लगावले. गिल आणि मिलर यांनी तिसऱ्या विकेटसाठी २४ चेंडूत ४३ धावांची भागिदारी केली. डेविड मिलर याने १२ चेंडूत नाबाद २१ धावांची खेळी केली. या खेळीत मिलरने एक षटकार आणि दोन चौकर लगावले.



लखनौकडून एकाही गोलंदाजाला लौकिकास साजेशी गोलंदाजी करता आली नाही. लखनौने आठ गोलंदाजाचा वापर केला. पण एकाही गोलंदाजाला प्रभावी मारा करता आला नाही. मोहसीन खान आणि आवेश खान यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतल्या. इतर सहा गोलंदाजांची पाटी कोरीच राहिली.