GT vs DC IPL 2022 : आजच्या दुसऱ्या सामन्यात ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील एमसीएच्या मैदानावर गुजरात आणि दिल्लीमध्ये सामना होत आहे. ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. गुजरातने पहिल्या सामन्यात लखनौचा पाच विकेटनं पराभव करत आयपीएलची सुरुवात दणक्यात केली होती. दुसरीकडे दिल्लीनेही पहिल्या सामन्यात मुंबईचा पराभव करत विजयाचा श्रीगणेशा केला. गुजरात आणि दिल्लीचा संघ विजयाची लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल. दोन्ही संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.
गुजरातने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही. गुजरातचा विजयी संघ कायम आहे. तर दिल्लीच्या संघात एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे. कमलेश नागरकोटेच्या जागी दिल्लीने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला संधी दिली आहे.
पिच रिपोर्ट -
पुण्यातील एमसीए क्रिकेटचं मैदान सुरुवातीला फलंदाजीसाठी पोषक आहे. त्यानंतर येथे फिरकी गोलंदाजांचा दबदबा राहतो. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा मदत मिळतो. दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ 80 टक्के जिंकला आहे.
दिल्लीचे 11 शिलेदार (Delhi Capitals )
पृथ्वी शॉ, टीम शेफर्ट, मनदीप सिंह, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), रोमेन प़वेल, ललीत यादव, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, मुस्तफिजूर रहमान
गुजरातचे 11 शिलेदार
शुबमन गिल, मॅथ्यू वेड (विकेटकिपर), विजय शंकर, अभिनव मनोहर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवातिया, राशिद खान, वरुण अॅरोन, लॉकी फर्गुसन, मोहम्मद शामी
दिल्लीची ताकद अन् कमजोरी काय?
दिल्लीची सर्वात मोठी ताकद सलामी जोडी होऊ शकते. पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर हे विस्फोटक फलंदाज कोणत्याही गोलंदाजाची धुलाई करण्यास सक्षम आहेत. त्याशिवाय ऋषभ पंतचा फॉर्म दिल्लीसाठी जमेजी बाजू आहे. गोलंदाजीबाबत बोलायचं झाल्यास, दिल्लीकडे एकापेक्षा एक दर्जेदार गोलंदाज आहेत. एनरिक नॉर्खिया, चेतन साकरिया, मुस्तफिजुर रहमान, लुंगी एनगिडी, शार्दूल ठाकुर आणि खलील अहमद यासारखे धुरंधर गोलंदाज दिल्लीकडे आहेत. मार्श आणि डेव्हिड वॉर्नर सुरुवातीच्या काही सामन्यांना उपलब्ध नाहीत. त्याशिवाय वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया दुखापतीतून सावरलेला नाही. आयपीएलमध्ये तो खेळणार की नाही? यावर सस्पेन्स आहे.
गुजरात टायटन्स संघाचा विचार करता त्यांच्याकडे असणारा बोलिगं अटॅक त्यांची सर्वात जमेची बाजू आहे. कारण संघात जगातील अव्वल दर्जाचा फिरकीपटू राशिद खान आहे. सोबत वेगवान गोलंदाजीसाठी लॉकी फर्ग्यूसन आणि मोहम्मद शमी सारखे दिग्गज आहेत. नवखा पण उत्तम असा अल्झारी जोसेफही गुजरातमध्ये असून अनुभवी जयंत यादव आणि आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असणारा राहुल तेवतिया संघात आहे. संघात सलामीवीरांचा प्रश्न काहीसा कठीण आहे. कारण नुकताच जेसन रॉय याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे एकट्या शुभमनवर सलामीची जबाबदारी आहे.